जागतिक टपाल दिन: खासदार धनंजय महाडिक यांचा पूत्र बनला पोस्टमन, टपालही केली वितरित 

By समीर देशपांडे | Updated: October 9, 2023 16:28 IST2023-10-09T16:27:30+5:302023-10-09T16:28:15+5:30

कोल्हापूर :  खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले कृष्णराज महाडिक यांनी आज जागतिक पोस्ट दिवस ...

World Postal Day: MP Dhananjay Mahadik son becomes a postman | जागतिक टपाल दिन: खासदार धनंजय महाडिक यांचा पूत्र बनला पोस्टमन, टपालही केली वितरित 

जागतिक टपाल दिन: खासदार धनंजय महाडिक यांचा पूत्र बनला पोस्टमन, टपालही केली वितरित 

कोल्हापूर :  खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले कृष्णराज महाडिक यांनी आज जागतिक पोस्ट दिवस असल्याने दस्तुरखुद्द पोस्टमन बनून पोस्टाच्या कामकाजाची माहिती तर घेतलीच पण खाकी गणवेश परिधान करून चक्क पोस्ट टपाल सुद्धा वितरित केले.

जेंव्हा टपाल द्यायला आलेली तरुण व्यक्ती पोस्टमन नसून खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आहेत हे कळालं तेंव्हा ज्यांच्या घरी पत्र,मनी ऑर्डर आणि एटीएम कार्ड वितरीत केली त्यांना सुखद धक्का बसला, आणि त्यांनी कृष्णराज महाडिक यांचं कौतुक ही केले. 

कृष्णराज हे अनेक कौटुंबिक आणि सामाजिक व्हिडिओ करून सोशल मीडियावर प्रसारित करत असतात. त्यांचा मोठा चाहता वर्ग असून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो. जागतिक टपाल दिनाच्या औचित्य साधून त्यांनी केलेल्या या कृतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली.

Web Title: World Postal Day: MP Dhananjay Mahadik son becomes a postman