शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती

जागतिक चिमणी दिवस : शहरी भागातच चिमण्यांचा चिवचिवाट कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 18:19 IST

चिमण्यांची चिवचिव कानी पडल्याशिवाय खेड्यातीलच नव्हे तर शहरातील सकाळही कधी उजाडलेली नाही. मात्र चिमण्यांचा चिवचिवाट शहरात कमी ऐकू येऊ लागला असला तरी ग्रामीण भागात चिमण्यांची संख्या कमी स्थिरच आहे, असे मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहायक संचालक डॉ. गिरिश जठार यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देजागतिक चिमणी दिवस : शहरी भागातच चिमण्यांचा चिवचिवाट कमीग्रामीण भागात स्थिर : चिमण्या कमी झाल्याची समजूत चुकीची

संदीप आडनाईककोल्हापूर : चिमण्यांची चिवचिव कानी पडल्याशिवाय खेड्यातीलच नव्हे तर शहरातील सकाळही कधी उजाडलेली नाही. मात्र चिमण्यांचा चिवचिवाट शहरात कमी ऐकू येऊ लागला असला तरी ग्रामीण भागात चिमण्यांची संख्या कमी स्थिरच आहे, असे मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहायक संचालक डॉ. गिरिश जठार यांनी व्यक्त केले आहे.

शहरातील चिमण्यांची संख्या कमी झाली असली तरी गेल्या २५ वर्षात नोंदवलेल्या निरिक्षणांनुसार त्यांनी फक्त आपला अधिवास बदललेला आहे. अन्न न मिळणे, वाढते प्रदूषण यांबरोबरच शेतात पिकांसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्यामुळे चिमण्या मोठ्या संख्येने कमी होत आहेत, हे जरी खरे असले तरी तुलनेने ग्रामीण भागात चिमण्यांनी आपले वास्तव्य सोडलेले नाही.‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून २० मार्च हा दिवस ओळखला जातो. ‘स्टेट आॅफ इंडियाज बर्ड २०२०’ या अहवालात चिमण्या वाढल्याची नोंद असली तरी ती शहरी भागात चिमण्या कमी झाल्याचे निरिक्षण देशभरातील सुमारे १५,५00 पक्षी निरिक्षकांनी नोंदविले आहे. नेहमीचा अधिवास सोडून चिमण्यांनी सुरक्षित आणि अन्न मिळेल अशा ठिकाणी आपला मुक्काम हलविला आहे, असे या निरिक्षणावरुन म्हणता येते.शहरातअन्न मिळत नसल्याने ग्रामीण भागात चिमण्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. असे असले तरी उसाच्या एकपीक पद्धतीमुळे ज्वारी, वरी, बाजरी, कुटकी, गहू यांसारखी पिके कमी नामशेष होत आहेत. त्यामुळे चिमण्यांना अन्न मिळत नाही.

पेरू, जांभूळ, अळू, तोरणे, धामणी, आसुळी, चिकुणी, निळुंबी, म्हेके, नेर्ली, करवंदे, बोर, चिंचा यांशिवाय बांधावरील चिवे, बांबू, बाभूळ, धावडा, भरुळा यांसारखी प्रादेशिक जंगली फळांची झाडे चिमण्यांच्या अन्नाचा नैसर्गिक स्रोत आहे. तो वाढविला पाहिजे. 

वाढत्या शहरीकरणामुळेही चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.  सिमेंटच्या घरबांधणीमुळे घरट्यांना जागाच उरलेली नाही. मात्र त्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागात वळवला आहे. चिमण्यांची संख्या स्थिर आहे, ती कमी निश्चितच झालेली नाही.- डॉ. गिरिश जठारसहाय्यक संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई 

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर