शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
5
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
6
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
7
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
8
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
9
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
10
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
11
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
12
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
13
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
14
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
15
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
16
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
17
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
18
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
19
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
20
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री

शिवाजी पुलाच्या कामावर थेट सोलापुरातून देखरेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:14 IST

पर्यायी शिवाजी पुलाचा मुख्य स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील किरकोळ कामे बुधवारपासून सुरू झाली. गेले दीड महिना या पुलाच्या कामांची देखरेख थेट सोलापूर उपविभागीय कार्यालयातून होत आहे. सोलापूर कार्यालयातील उपअभियंतापदाचा कार्यभार सांभाळत अशोकराव भोसले हे धावता कोल्हापूर दौरा करून पुलाच्या कामांवर लक्ष ठेवून आहेत.

ठळक मुद्देमुख्य अभियंता, शाखा अभियंता गायब : उर्वरित कामे सुरू पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीस सुरू होणार

तानाजी पोवारकोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचा मुख्य स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील किरकोळ कामे बुधवारपासून सुरू झाली. गेले दीड महिना या पुलाच्या कामांची देखरेख थेट सोलापूर उपविभागीय कार्यालयातून होत आहे. सोलापूर कार्यालयातील उपअभियंतापदाचा कार्यभार सांभाळत अशोकराव भोसले हे धावता कोल्हापूर दौरा करून पुलाच्या कामांवर लक्ष ठेवून आहेत.कोल्हापुरात त्यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार असला, तरी मुख्य अभियंता व शाखाअभियंता या दोन्हीही पदांवरील अधिकारी गायब असल्याने ही पदेही तेच सांभाळत आहेत. तरीही पूल मेअखेर पूर्ण करून वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने कामाला गती दिली आहे.पर्यायी शिवाजी पुलाचे काम हे नेहमीप्रमाणे वादग्रस्तच स्थितीतून प्रवास करत आहे. प्रारंभीपासूनच या पुलाच्या कामात अडथळ्याची शर्यत सुरू आहे. चार महिन्यांपूर्वी पुलाच्या कामाचे उपअभियंता संपत आबदार हे वादग्रस्त बनल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यातून कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांची बदली झाली. त्यानंतर शाखाअभियंता प्रशांत मुंघाटे हे वरिष्ठांचा दबाव घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले; पण तेही आता गेले दोन महिने पुलाकडे फिरकलेच नाहीत.

दि. १७ मार्चपासून सोलापूर उपविभागीय कार्यालयातील उपअभियंता अशोकराव भोसले यांच्याकडे कोल्हापुरातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार सोपविला. पुलाच्या मुख्य स्लॅबचे काँक्रीट टाकताना शाखा अभियंता मुंघाटे नसल्याने त्यांच्याजागी दि. २६ मार्च रोजी कोल्हापूर उपविभागाने यशवंत खोत आणि अनिल पाटील हे दोन नवे शाखाअभियंता दिले; पण स्लॅब टाकल्यानंतर हे दोन शाखाअभियंता तातडीने काढून घेतले.पुढील कामांसाठी भोसले यांच्या हाताखाली सहकारी नसल्याची स्थिती आहे.अधिकाऱ्यांतील बेबंदशाहीत व समन्वयाचा फटका शिवाजी पुलाच्या कामाला बसत आहे. उपअभियंता अशोकराव भोसले हे थेट सोलापूर कार्यालयातून या कामाचा पाठपुरावा घेतात, आठवड्यातून एक दिवस कोल्हापूर दौरा करून सायंकाळी पुन्हा सोलापूरकडे रवाना होतात.

नकाशे उपअभियंता कार्यालयातचअधिकाऱ्यांतील समन्वयाअभावी नवीन पुलाच्या कामाचे नकाशे, स्ट्रक्चरल डिझाईन व इतर कागदपत्रे ही राष्टÑीय महामार्ग उपविभागाकडे आहेत. ती उपअभियंता भोसले यांच्या हाती मिळालेली नाहीत.

पुलाची कामे शिल्लकपुलाचा संरक्षण कठडा, पश्चिमेकडे रस्त्याचे खडीकरण-डांबरीकरण, पूर्वेकडे भराव, रस्त्याचे खडीकरण-डांबरीकरण, आदी कामे बाकी आहेत. केबल ओढण्याचे (पोष्ट टेन्शनिंग)चे काम बुधवारपासून सुरू असून,चार दिवसांत पूर्ण होईल. जरी पावसाळा सुरू झाला, तरीही पुलाचे मूळ काम पूर्ण झाल्याने त्याला पुराचा कोणताही धोका नाही.भोसले मेअखेर निवृत्तमहिन्यापूर्वी कोल्हापुरातील अतिरिक्त पदभार सांभाळणारे अशोकराव भोसले हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तत्पूर्वी हे पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचा त्यांचा कयास आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर