शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सरकारी बँक कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, ३५० कोटींची उलाढाल ठप्प; ग्राहकांना त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:17 IST

पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी : बँक ऑफ इंडियाच्या दारात केली निदर्शने

कोल्हापूर : कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करा, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी संयुक्त बँक कर्मचारी संघटनांच्या वतीने कामबंद आंदोलन केले. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच सरकारी बँकांचे कर्मचारी सहभागी झाल्याने ३५० कोटींची उलाढाल ठप्प झाली. या संपामुळे बँकिंग क्षेत्र काहीसे विस्कळीत झाले होते.वाढता कामाचा ताण, मनुष्यबळाची कमतरतेमुळे कर्मचाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. परिणामी, ग्राहक सेवेच्या गुणवत्तेवर तसेच बँकांच्या एकूण कार्यक्षमतेवरही विपरीत परिणाम होत आहे. सध्या महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी बँकांचे कामकाज बंद असते. उर्वरित पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारीही काम बंद ठेवावे, अशी मागणी कर्मचारी संघटनांची आहे. याबाबत बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी मुख्य कार्यालयाच्या दारात निदर्शने केली. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात व्यापक व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.सुशांत मुळीक, महिंद्र ताडे, स्नेहल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अक्षय स्वामी, राहुल पवार, जयदीप कवडे, संतोष गावडे, गणेश कुडाळकर, चंद्रकांत कुंभार, सुनील जाधव, रणजीत पवार अनिकेत शिंदे, जीवन करवीरकर, धीरज कुराडे, विनायक लाड, राहुल एडवणे, प्रफुल जाधव, दीपक बलिगा, आय. बी. मुंशी, अनिता जाधव, संतोष साळुंखे, संजय मगदूम, सागर कांबळे आदी सहभागी झाले होते.चार दिवस बँका बंदमुळे ग्राहकांना त्राससरकारी बँका शनिवारी, रविवारची शासकीय, तर सोमवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बंद होत्या. त्यात मंगळवारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने सलग चार दिवस बँकांचे कामकाज ठप्प राहिले.या चार दिवसांत चेक क्लिअरिंग सुमारे १४०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. त्याचा परिणाम व्यापारी, औद्योगिक व सर्वसामान्य ग्राहकांवर झाला.

कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाल्याने आज संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभे राहिले आहे. सरकारला कोणतीही तडजोड न करता पाच दिवसांचा आठवड्याचा निर्णय घ्यावा लागेल. - विकास देसाई (सचिव, युनाटेड फोरम ऑफ बँक युनियन)

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Bank Strike Paralyzes Transactions, Customers Face Hardship

Web Summary : Kolhapur bank employees' strike halts ₹350 crore transactions demanding five-day week. Banking disrupted, impacting businesses and customers. Unions warn of intensified action if demands are unmet.