Kolhapur: सरकारी बँक कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, ३५० कोटींची उलाढाल ठप्प; ग्राहकांना त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:17 IST2026-01-28T18:16:00+5:302026-01-28T18:17:01+5:30

पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी : बँक ऑफ इंडियाच्या दारात केली निदर्शने

Work stoppage protest by joint bank employees unions for various demands including five-day working week | Kolhapur: सरकारी बँक कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, ३५० कोटींची उलाढाल ठप्प; ग्राहकांना त्रास

Kolhapur: सरकारी बँक कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, ३५० कोटींची उलाढाल ठप्प; ग्राहकांना त्रास

कोल्हापूर : कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करा, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी संयुक्त बँक कर्मचारी संघटनांच्या वतीने कामबंद आंदोलन केले. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच सरकारी बँकांचे कर्मचारी सहभागी झाल्याने ३५० कोटींची उलाढाल ठप्प झाली. या संपामुळे बँकिंग क्षेत्र काहीसे विस्कळीत झाले होते.

वाढता कामाचा ताण, मनुष्यबळाची कमतरतेमुळे कर्मचाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. परिणामी, ग्राहक सेवेच्या गुणवत्तेवर तसेच बँकांच्या एकूण कार्यक्षमतेवरही विपरीत परिणाम होत आहे. सध्या महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी बँकांचे कामकाज बंद असते. उर्वरित पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारीही काम बंद ठेवावे, अशी मागणी कर्मचारी संघटनांची आहे. याबाबत बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी मुख्य कार्यालयाच्या दारात निदर्शने केली. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात व्यापक व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

सुशांत मुळीक, महिंद्र ताडे, स्नेहल पाटील यांच्या नेतृत्वाखाली अक्षय स्वामी, राहुल पवार, जयदीप कवडे, संतोष गावडे, गणेश कुडाळकर, चंद्रकांत कुंभार, सुनील जाधव, रणजीत पवार अनिकेत शिंदे, जीवन करवीरकर, धीरज कुराडे, विनायक लाड, राहुल एडवणे, प्रफुल जाधव, दीपक बलिगा, आय. बी. मुंशी, अनिता जाधव, संतोष साळुंखे, संजय मगदूम, सागर कांबळे आदी सहभागी झाले होते.

चार दिवस बँका बंदमुळे ग्राहकांना त्रास

सरकारी बँका शनिवारी, रविवारची शासकीय, तर सोमवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बंद होत्या. त्यात मंगळवारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने सलग चार दिवस बँकांचे कामकाज ठप्प राहिले.
या चार दिवसांत चेक क्लिअरिंग सुमारे १४०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. त्याचा परिणाम व्यापारी, औद्योगिक व सर्वसामान्य ग्राहकांवर झाला.

कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाल्याने आज संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभे राहिले आहे. सरकारला कोणतीही तडजोड न करता पाच दिवसांचा आठवड्याचा निर्णय घ्यावा लागेल. - विकास देसाई (सचिव, युनाटेड फोरम ऑफ बँक युनियन)

Web Title : कोल्हापुर बैंक हड़ताल से लेनदेन ठप, ग्राहकों को परेशानी

Web Summary : कोल्हापुर में बैंक कर्मचारियों की हड़ताल से 350 करोड़ रुपये का लेनदेन ठप। पांच दिवसीय सप्ताह की मांग। बैंकिंग बाधित, व्यवसायों और ग्राहकों पर असर। यूनियनों ने मांगें पूरी न होने पर आंदोलन तेज करने की चेतावनी दी।

Web Title : Kolhapur Bank Strike Paralyzes Transactions, Customers Face Hardship

Web Summary : Kolhapur bank employees' strike halts ₹350 crore transactions demanding five-day week. Banking disrupted, impacting businesses and customers. Unions warn of intensified action if demands are unmet.