प्रमुख रस्त्यांच्या बाजूपट्टीचे काम सुरू, तीन रस्त्यांवर होणार काँक्रिटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 02:44 PM2019-09-04T14:44:35+5:302019-09-04T14:47:03+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३२, बिंदू चौक या प्रभागातील प्रमुख रहदारी व वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांच्या बाजूपट्टी करण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले; यासाठी सुमारे २५ लाखांचा निधी तत्कालीन आयुक्त अभिजित चौधरी यांनी उपलब्ध करून दिला होता.

Work on the side of major roads will start, concreteization will take place on three roads | प्रमुख रस्त्यांच्या बाजूपट्टीचे काम सुरू, तीन रस्त्यांवर होणार काँक्रिटीकरण

प्रमुख रस्त्यांच्या बाजूपट्टीचे काम सुरू, तीन रस्त्यांवर होणार काँक्रिटीकरण

Next
ठळक मुद्देप्रमुख रस्त्यांच्या बाजूपट्टीचे काम सुरूतीन रस्त्यांवर होणार काँक्रिटीकरण

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३२, बिंदू चौक या प्रभागातील प्रमुख रहदारी व वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्यांच्या बाजूपट्टी करण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले; यासाठी सुमारे २५ लाखांचा निधी तत्कालीन आयुक्त अभिजित चौधरी यांनी उपलब्ध करून दिला होता.

बिंदू चौक ते शिवाजी महाराज चौक, माळकर तिकटी ते भवानी मंडप कमान, तसेच माळकर तिकटी ते मिलन हॉटेल या रस्त्याच्या बाजूपट्ट्या गेल्या ३७ वर्षांपासून झालेल्या नव्हत्या. या प्रभागाचे नगरसेवक ईश्वर परमार यांच्या प्रयत्नातून वरील तीन प्रमुख मार्गांच्या बाजूपट्ट्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले.

कामाचा प्रारंभ मंगळवारी नगरसेवक परमार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विश्वनाथ कोरी, रमेश हावळ, रणजित चव्हाण, अजित पवार, मंगेश शिरोडकर, इकबाल बारगीर, संजय जाधव, अजित चव्हाण, विनायक मोरे, उदय भोसले, अविनाश भालकर, प्रमोद ढवळे, आकाश मोरे, संजय मोरे, कामाचे ठेकेदार अशिष मोटे व मनपा अधिकारी बाबूराव दबडे, अवधूत नेर्लेकर, राहुल जाधव, आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: Work on the side of major roads will start, concreteization will take place on three roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.