गिरगावच्या कोविड सेंटरचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:23 IST2021-05-18T04:23:42+5:302021-05-18T04:23:42+5:30

दिंडनेर्ली : राजकारण, गट-तट बाजूला ठेवून कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी गिरगावमधील तरुणांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरचे ...

The work of Kovid Center in Girgaum is commendable | गिरगावच्या कोविड सेंटरचे कार्य कौतुकास्पद

गिरगावच्या कोविड सेंटरचे कार्य कौतुकास्पद

दिंडनेर्ली : राजकारण, गट-तट बाजूला ठेवून कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी गिरगावमधील तरुणांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे, असे गौरवोदगार शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी काढले. संभाजी ब्रिगेडने गिरगाव येथे राजर्षी शाहू आश्रमशाळेमध्येे सुरू केलेल्या कोविड सेंटरला घाटगे यांनी भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी घाटगे यांनी या कोविड सेंटरसाठी शाहू सहकार समूहाकडून सर्व मदत करू, अशी ग्वाही दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष रूपेश पाटील, भगवान कोईगडे, आसिफ स्वार, विवेक मिठारी, अभिजित पाटील (टाकळकर), अक्षय पाटील, भास्कर कुरणे, महादेव कांबळे, रोहित खंडागळे, किरण पाटील उपस्थित होते.

फोटो : १७ गिरगाव कोविड सेंटर

ओळी :

गिरगाव येथील कोविड सेंटरला भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी भेट दिली. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील उपस्थित होते.

Web Title: The work of Kovid Center in Girgaum is commendable