शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

मुंबईतील कळंबोलीतून महिला पोलीस अधिकारीच दीड वर्षापासून बेपत्ता-घातपाताचा संशय, कोल्हापूर जिल्'ातील आळते येथील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 10:24 PM

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकाºयाचा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास करण्यात पोलीस टाळाटाळ

ठळक मुद्देकुटुंबीयांची तक्रार : : तपासाकडे दुर्लक्षकोल्हापूर जिल्'ातील आळते येथील अश्विनी जयकुमार बिंद्रे

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकाºयाचा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास करण्यात पोलीस टाळाटाळ करीत असल्याची तक्रार महिला पोलीस अधिकाºयाचे वडील जयकुमार बिद्रे, भाऊ आनंद बिद्रे व पती राजू गोरे यांनी केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या या महिलेचा तिचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व सध्या ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी अभय श्यामसुंदर कुरुंदकर यांनी घातपात केला असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. ३१ जानेवारी २०१७ ला कळंबोली पोलिस ठाण्यात कुरुंदकर यांच्यावर याप्रकरणी अपहरणाचा (भादंवि कलम ३६४) गुन्हा (एफआयआर नंबर ००२९) दाखल झाला आहे.

अश्विनी राजू गोरे-बिद्रे या महिला पोलीस अधिकारी मुंबईतील कळंबोलीतून १५ एप्रिल २०१६ पासून बेपत्ता झाल्या आहेत. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी त्यांना बेपत्ता केल्याचा आरोप करीत, त्यांच्यावर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या तपासात पोलीसच त्यांना सहकार्य करीत नसल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कोल्हापूर जिल्'ातील आळते येथील अश्विनी जयकुमार बिंद्रे यांचा विवाह २००५ साली हातकणंगलेतील सामाजिक कार्यकर्ते राजू गोरे यांच्याशी झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलीस उपनिरीक्षक पद मिळाले. त्यांना एक मुलगी असून, ती सध्या हातकणंगलेमध्येच तिसरीत शिकते. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यात असणाºया वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर २०१३ साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर हे अश्विनीला भेटण्यासाठी वांरवार येत होते. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजले.

पुढच्या टप्प्यात कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरांनी अश्विनी यांच्या पतीला गायब करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचे कुटुंब व्यथित झाले होते. या काळातच २०१५ साली अश्विनी यांची बदली कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत अशी विचारणा करणारे पत्र पोलीस खात्यानेही पाठविले. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी कळंबोली पोलिसांत याची तक्रार दाखल केली.

अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनीने आपल्या संगणकात रेकॉर्ड करून ठेवले होते. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदरकर यांनी भांडणादरम्यान वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे उघड झाले. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच कुरुंदकर हे तत्काळ रजेवर गेले. गेल्या महिन्यात ते पुन्हा रुजू झाले. मात्र पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी अद्यापही ताब्यात घेतलेले नाही.पोलिसांचे सहकार्य नाहीया प्रकरणी अश्विनीच्या कुटुंबीयांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांची भेट मागितली होती. मात्र त्यांना ती मिळाली नाही. उलट त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटा, असा सल्ला दिला.चौकशीत हयगय म्हणून प्रसारमाध्यमांकडे धावअश्विनी गोरे बेपत्ता झाल्या असल्याची तक्रार त्यांचा भाऊ आनंद बिद्रे याने १४ जुलै २०१६ ला कळंबोली पोलिसांत दिली आहे. परंतू पोलीस त्याची दखल घ्यायला तयार नाहीत म्हणून बिद्रे व पती राजू गोरे यांनी आॅक्टोबर २०१६ ला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने उपायुक्त दर्जाच्या अधिकाºयाने याचा तपास करावा असे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी कुरुंदकर यांच्यावर फेब्रुवारी २०१७ मध्ये गुन्हा दाखल केला व तशी माहिती न्यायालयातही दिली; परंतु तरीही त्यांना अटक करून प्रकरणाची चौकशी केली नाही म्हणून गुरुवारी यासंबंधीची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 

 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे