कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा २५ एप्रिलपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 12:24 IST2023-04-10T12:23:00+5:302023-04-10T12:24:01+5:30

स्पर्धेस भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंग उपस्थित राहणार

Women Maharashtra Kesari Competition in Kolhapur from 25th April | कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा २५ एप्रिलपासून

कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा २५ एप्रिलपासून

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये २५ ते २७ एप्रिलदरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेस भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंग उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

दीपाली सय्यद म्हणाल्या, स्पर्धेच्या निवड चाचणीबाबत सर्व जिल्हा संघांना कळविण्यात आले आहे. एकूण १० वजनी गटांमध्ये या स्पर्धा होणार आहेत. महाराष्ट्र केसरी होणाऱ्या महिला कुस्तीपटूस दुचाकी गाडी बक्षीस देण्यात येणार आहे.

योगेश दोडके म्हणाले, पुण्यात झालेली महाराष्ट्र केसरी स्पर्धेत भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीतर्फे प्रत्येक वजनी गटातील विजेत्या मल्लांना भरघोस बक्षिसे देण्यात आली होती. याच हेतूने महिला कुस्तीगिरांनासुद्धा या स्पर्धेत भरघोस बक्षीस दिली जाणार आहेत.

Web Title: Women Maharashtra Kesari Competition in Kolhapur from 25th April