राजेंद्रनगरमध्ये महिलेला मारहाण, चौघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 16:24 IST2019-05-08T16:23:06+5:302019-05-08T16:24:26+5:30

राजेंद्रनगर येथे महिलांच्या किरकोळ वादातुन महिलेला मारहाण केलेप्रकरणी चौघांना राजारामपुरी पोलीसांनी ताब्यात घेतले. संशयित गणेश बाबु पाटील (वय ५०), सुरज गणेश पाटील (२५), सागर गणेश पाटील (२२, तिघे रा. राजेंद्रनगर), करण उत्तम पाटील (२२, रा. उद्यमनगर) अशी त्यांची नावे आहेत.

A woman was beaten in Rajendranagar, four inmates | राजेंद्रनगरमध्ये महिलेला मारहाण, चौघे ताब्यात

राजेंद्रनगरमध्ये महिलेला मारहाण, चौघे ताब्यात

ठळक मुद्देराजेंद्रनगरमध्ये महिलेला मारहाण, चौघे ताब्यातमहिलांशी किरकोळ कारणातुन वाद

कोल्हापूर : राजेंद्रनगर येथे महिलांच्या किरकोळ वादातुन महिलेला मारहाण केलेप्रकरणी चौघांना राजारामपुरी पोलीसांनी ताब्यात घेतले. संशयित गणेश बाबु पाटील (वय ५०), सुरज गणेश पाटील (२५), सागर गणेश पाटील (२२, तिघे रा. राजेंद्रनगर), करण उत्तम पाटील (२२, रा. उद्यमनगर) अशी त्यांची नावे आहेत.

राजेंद्रनगरमध्ये फिर्यादी रेखा चरण खोरागडे (३०) यांचा गल्लीतील काही महिलांशी किरकोळ कारणातुन मंगळवारी (दि. ७) वाद झाला होता. त्यातुन संशयित गणेश पाटील व सुरज पाटील यांनी रेखा यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या पायास गंभीर दूखापत झाली.

त्यांचेवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीसांनी संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील तपास करीत आहेत.
 

 

Web Title: A woman was beaten in Rajendranagar, four inmates