Kolhapur: अज्ञाताकडून वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून डॉक्टर महिलेस त्रास, राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद

By उद्धव गोडसे | Updated: March 6, 2024 12:11 IST2024-03-06T12:10:51+5:302024-03-06T12:11:43+5:30

संशयिताचा शोध सुरू, दोन वर्षांपासून सुरू होता प्रकार

Woman doctor harassed by unknown person from different mobile numbers in Kolhapur | Kolhapur: अज्ञाताकडून वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून डॉक्टर महिलेस त्रास, राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद

Kolhapur: अज्ञाताकडून वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून डॉक्टर महिलेस त्रास, राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद

कोल्हापूर : शहरातील एका डॉक्टर महिलेस वेगवेगळ्या १५ मोबाइल नंबरवरून वारंवार फोन करून आणि पाठलाग करून त्रास देण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पीडित महिलेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, मोबाइल नंबरवरून संशयिताचा शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका डॉक्टर महिलेस अनोळखी मोबाइल नंबरवरून फोन येत होते. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, संबंधित व्यक्तीने वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून त्रास देणे सुरूच ठेवले. लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील बोलणे, धमकावणे असे प्रकार त्याच्याकडून सुरू होते. काहीवेळा त्याने पाठलागही केला.

मे २०२२ पासून सुरू असलेल्या प्रकाराला कंटाळून अखेर पीडित महिलेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. मोबाइल नंबरवरून संशयिताचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.

Web Title: Woman doctor harassed by unknown person from different mobile numbers in Kolhapur