शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या, शेकापची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 16:51 IST2020-09-25T16:49:30+5:302020-09-25T16:51:21+5:30
गडहिंग्लज :केवळ बहुमताच्या जोरावर मंजूर केलेली शेतकरीविरोधी विधेयके केंद्राने मागे घ्यावीत, अशी शेतकरी कामगार पक्षातर्फे येथील तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून ...

गडहिंग्लज येथे शेकापतर्फे तहसिलदार दिनेश पारगे यांना वसंत कांबळे यांनी निवेदन दिले. यावेळी लक्ष्मण नाईक, आण्णाप्पा अत्याळे, भरत सुतार, जयवंत दळवी, बबन कांबळे आदी उपस्थित होते.
ठळक मुद्देशेतकरी विरोधी कायदे मागे घ्या, शेकापची मागणी गडहिंग्लजच्या तहसिलदारांना निवेदन
गडहिंग्लज :केवळ बहुमताच्या जोरावर मंजूर केलेली शेतकरीविरोधी विधेयके केंद्राने मागे घ्यावीत, अशी शेतकरी कामगार पक्षातर्फे येथील तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
तहसिलदार दिनेश पारगे यांची शिष्टमंडळाने भेट घेवून हे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात तालुका चिटणीस वसंत कांबळे, लक्ष्मण नाईक, आण्णाप्पा अत्याळे, भरत सुतार, जयवंत दळवी, बबन कांबळे आदींचा समावेश होता.
निवेदनात म्हटले आहे, खुल्या आर्थिक धोरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे संरक्षण काढून सरकारने त्याला देशोधडीला लावले आहे. त्याला पाठिंबा देवून शिवसेना व राष्ट्रवादीने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.