शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मलकापुरात गारांसह वादळी पाऊस

By admin | Updated: March 2, 2016 01:25 IST

लाखोंचे नुकसान : वालूर येथे झाड पडून कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक ठप्प

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात मंगळवारी विजेच्या कडकडाटांसह सुमारे तीन तासांपेक्षा अधिक काळ वादळी वारे व गारांसह अवकाळी पाऊस झाला. पावसाने ठिकठिकाणच्या घरांवरील पत्रे उडाली, तर काहींच्या शेतातील पिकांच्या नुकसानीबरोबरच आंब्याचा मोहरही गळून पडला. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वालूर येथे माड पडल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. दुपारी ३. ३० वाजता सुरू झालेल्या या पावसाने तालुक्यातील ठिकठिकाणी सुमारे सात लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही गावांतील वीजपुरवठा व दूरध्वनी सेवा खंडित झाल्याने काही गावांचा संपर्कही तुटला होता. या अवकाळी पावसात कडवे येथील शेतकरी राजा कृषिसेवा केंद्राचे पत्रे उडून दोन लाख रुपयांचे, तर तालुक्यातील काही घरांचे पत्रे उडाले. बांबवडे, सरुड, कोतोली, शित्तूर वारुण, मलकापूर, आदी भागातील वीटभट्टया भिजल्यानेही मालकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. काही शेतकऱ्यांचेही गवत भिजल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे, तर कडवे येथीलराजाराम नानू आग्रे यांच्या शेतकरी राजा कृषी सेवा केंद्राचे पत्रे उडून गेल्यामुळे खताची पोती भिजून दोन लाखांचे नुकसान झाले. इकबाल इब्राहिम बोबडे व भीमराव गायकवाड यांच्या, तर मलकापूर येथील साखरे गल्लीतील कुलकर्णी यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. आजरा बँकेसमोरील विद्युत खांब व विद्युतवाहिन्या सोसाट्याच्या वाऱ्याने पूर्णपणे धोकादायक स्थितीत वाकल्या होत्या. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील धोपेश्वर फाट्याजवळही झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.येथील वडगाव, रेठरे, मालेवाडी, पिरळे, जांभूर, खेडे, कडवेचा भागातील गुऱ्हाळघरांनाही याचा मोठा फटका बसला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला मका, गहू, हरबरा, सूर्यफुल पिकांनाही पावसाचा तडाखा सोसावा लागल्याने शेतकरी हतबल झाल्याचे दिसत होते. काही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेले कलिंगड पीकही पूर्णपणे पावसामुळे उद्ध्वस्त झाले. दरम्यान, शाहूवाडी येथील आठवडा बाजारही विस्कळीत झाल्याने दिवसभर जमलेल्या छोट्या-मोठ्या व्यापारी वर्गालाही आजच्या कमाईवर पाणी सोडावे लागले. तालुक्यातील वाळूर, निनाईपरळे, आंबा, कडवे, आदी गावांतील काही रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने जोड रस्ते व गावातील वाहतूक काही काळ ठप्प होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.जोतिबा परिसरात पावसाचा शिडकावापोहाळे तर्फ आळते : कुशिरे, पोहाळे, गिरोली व जोतिबा परिसरात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता पावसाने तुरळक हजेरी लावली. अर्धा तास चाललेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. दोन-तीन दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. परिसरात दुपारपासून ढगाळ वातावरण होते. कसबा बावड्यात पावसाची हुलकावणीकसबा बावडा : कसबा बावड्याच्या काही भागात मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास अवघे पाच सहा मिनिटे पावसाचा शिडकाव झाला. नंतर मात्र पावसाने दडी मारली. दरम्यान, पावसाळी वातावरण बराच काळ राहिले होते.विदर्भापासून आसामपर्यंत हवेच्या दाबाचे द्रोणीय क्षेत्र तयार झाल्याने राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. कसबा बावडा, आदी परिसरात गेले दोन दिवस पावसाचे वातावरण होते. पाऊस केव्हा पडेल, याचा अंदाज शेतकरी वर्ग बांधत होता. मंगळवारी मात्र पावसाचे वातावरण चांगलेच झाले होते. सायंकाळी सातच्या सुमारास हनुमान मंदिर, दत्त मंदिर, प्रिन्स शिवाजी शाळा, शुगर मिल, शिये टोलनाका, आदींसह काही भागात पाच ते सहा मिनिटे, परंतु अधूनमधून पावसाचा शिडकाव चालू होता.अवकाळी पावसाने तारांबळ४सरुड व परिसरात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि वीट व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात उष्णता होती. ४आकाशात ढगही जमा झाले होते. दुपारी चार वाजता अचानक आलेल्या पावसामुळे वीट व्यावसायिक, शेतकरी तसेच ऊस तोडणी कामगारांची चांगलीच तारांबळ उडाली. मंगळवारी सरुडचा आठवडा बाजार असल्याने व्यापाऱ्यांची व गिऱ्हाईक यांची चांगलीच धावपळ उडाली.