भाजपविरोधात हवा; भडका उडवा : हसन मुश्रीफ यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:45 IST2018-10-21T00:43:58+5:302018-10-21T00:45:35+5:30
राज्य व केंद्र सरकारविरोधात सध्या वातावरण तयार होत असून, त्याला हवा देऊन ‘भडका’ उडवून द्या, असे आवाहन राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. शनिवारी (दि. २७) कोल्हापुरात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेला ‘युवा आक्रोश मेळावा’

भाजपविरोधात हवा; भडका उडवा : हसन मुश्रीफ यांचे आवाहन
कोल्हापूर : राज्य व केंद्र सरकारविरोधात सध्या वातावरण तयार होत असून, त्याला हवा देऊन ‘भडका’ उडवून द्या, असे आवाहन राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. शनिवारी (दि. २७) कोल्हापुरात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेला ‘युवा आक्रोश मेळावा’ यशस्वी करा, असेही त्यांनी सांगितले.
युवक राष्टवादीचा ‘युवा आक्रोश मेळावा’ शनिवारी दुपारी बारा वाजता शाहू सांस्कृतिक मंदिर, मार्केट यार्ड येथे होत आहे. त्याच्या तयारीसाठी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी जिल्हा पक्ष कार्यालयात झाली. यावेळी ‘युवक’चे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील उपस्थित होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. युवक, महिला, शेतकरी, उद्योजकांसह देशातील एकही घटक समाधानी नाही. सगळीकडे अस्वस्थता पसरली असून, उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटाबंदी करून सामान्य माणसाला वेठीस धरण्याचे काम या सरकारने केले आहे. भाजप सरकार घालविण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. युवकांनी
सावध राहून सरकारविरोधातील वातावरणाला हवा देऊन त्याचा ‘भडका’ उडवावा.
संग्राम कोते-पाटील म्हणाले, राज्यातील तीस लाख विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आता संघर्ष सुरू करा. ‘युवा आक्रोश’ मेळाव्यासाठी अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित राहणार असून, युवकांनी मोठ्या ताकदीने यावे. युवक राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी प्रास्ताविक केले. युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी स्वागत केले. निवेदिता माने, के. पी. पाटील, अनिल साळोखे, भैया माने, बाबासाहेब पाटील, बी. एन. पाटील, आर. के. पोवार, मधुकर जांभळे, संगीता खाडे, आदी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आभार मानले.
मेळावे नकोत, आता लढा
राज्यभरात मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आक्रमक करण्याचे काम सुरू आहे; पण आता मेळावे नकोत. दृश्य स्वरूपातील लढा उभा करा, अशा सूचना खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याचे कोते-पाटील यांनी सांगितले.
मुश्रीफ ‘महसूल’मंत्री व्हावेत
जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आपल्या शैलीत उपस्थितांचे चिमटे काढले. प्रत्येक तालुक्यातून स्वतंत्रपणे २०० युवकांनी रॅलीने यावे. ‘भुदरगड’च्या मंडळींनाही ते दाखवावे, असे आवाहन करीत सगळ्यांनी खूणगाठ बांधून अजित पवार यांना मुख्यमंत्री करूया आणि हसन मुश्रीफ यांना दुसºया क्रमांकाचे ‘महसूल’ मंत्रिपद मिळण्यासाठी प्रयत्न करूया, असे पाटील सांगितले.
राष्टÑवादी कॉँग्रेसच्या युवा आक्रोश मेळाव्याच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत आमदार हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी निवेदिता माने, संग्राम कोते-पाटील, ए. वाय. पाटील, संगीता खाडे, आदी उपस्थित होते.