शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांपुढे सदाभाऊंच्या मंत्रिपदाची तुतारी वाजणार का?

By admin | Updated: June 4, 2016 00:29 IST

वाळवा-शिराळ्यातील चित्र : विरोधकांकडे कार्यकर्त्यांची वानवा असल्याने त्यांचे आव्हान तोकडे; आता तरी कार्यकर्त्यांना बळ मिळणार का?

अशोक पाटील -- इस्लामपूर वाळवा-शिराळ्यात माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या संस्थांची ताकद मोठी आहे. तेथील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांच्या जोरावर प्रत्येक निवडणुकीत आ. पाटील बाजी मारतात. विरोधकांकडे कार्यकर्त्यांची वानवा असल्याने त्यांचे आव्हान तोकडे ठरते. आता ‘आमदार’ होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांचीतरी ताकद वाढून आ. पाटील यांच्यापुढे सशक्त पर्याय निर्माण होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.शिराळ्याच्या शिवाजीराव देशमुख यांनी कॅबिनेट मंत्री, विधान परिषदेच्या सभापतीपदापर्यंत मजल मारली. सध्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनीही मंत्रीपद भूषविले आहे. माजी आमदार मानसिंगराव नाईक हेही आमदार होते. या मतदार संघातील राजकीय समीकरणे नेहमीच बदलतात. आता या मतदार संघातील, मात्र वाळवा तालुक्यातील सदाभाऊ खोत यांना भाजपने आमदारकी देऊन मंत्रीपदाचे आश्वासन दिले आहे.वाळवा तालुक्यात मात्र वेगळे चित्र आहे. राजारामबापू पाटील यांनी उभ्या केलेल्या संस्था जयंत पाटील यांनी वाढवल्या आहेत. या तालुक्यातील अण्णासाहेब डांगे यांनी पाच वर्षे मंत्रीपद भूषविले. परंतु त्यांना कार्यकर्त्यांच्या रूपाने ताकद दाखवता आली नाही. तथापि सूतगिरणी व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी पाय रोवले आहेत. हुतात्मा संकुलाचे संस्थापक क्रांतिसिंह नागनाथअण्णा नायकवडी आमदार झाले. त्यानंतर वाळवा व परिसरातील १५ गावांवर पकड मजबूत करून सहकार, शिक्षण क्षेत्रात त्यांनी प्रगती केली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र वैभव नायकवडी यांनी सर्व सूत्रे हाती घेतली. मात्र त्यांची ताकद आ. पाटील यांच्यापुढे तोकडी पडत गेली. शिक्षकांच्या बळावर येलूरचे शिवाजीराव पाटील आणि इस्लामपूरच्या भगवानराव साळुंखे यांनी आमदारपद मिळवले, पण त्यांनी बांधलेल्या शिक्षक संघटनेची ताकद आता दिसत नाही.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी पश्चिम महाराष्ट्रात ऊसदर आंदोलन पेटवले होते. त्याचा शेतकऱ्यांना फायदाही झाला. या आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांचे नेते जयंत पाटील यांचा उघड विरोध होता. तरीही संघटनेने आंदोलन तीव्र केले. लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, आर.पी.आय., स्वाभिमानी व इतर पक्षांनी एकत्र येऊन महायुती केली. हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी निवडून आले, परंतु माढ्यातून खोत पराभूत झाले. मोदी लाटेच्या जोरावर भाजपची सत्ता आली. खोत यांचा निसटता पराभव झाल्याने त्यांना आमदार, मंत्रिपदाची संधी देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. भाजपच्या नेत्यांनी दिलेला शब्द पाळला असून खोत यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे. ते आमदार होतील, मंत्रीपदही मिळेल. परंतु वाळवा तालुक्यात प्राबल्य असलेल्या आ. पाटील यांच्यापुढे त्यांची ताकद कितपत चालणार, हे लवकरच दिसून येईल.ऊस उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरजपरिसरात ६0 ते ६५ टक्के शेतकरी ऊस उत्पादक आहेत. त्यामुळे उसाला दर मिळण्यासाठी ऊस उत्पादक लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या पाठीशी राहतात, तर विधानसभेला आमदार जयंत पाटील यांना निवडून देतात. भाजपसोबत असलेल्या राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी यंदा ऊसदरप्रश्नी कसलेही आंदोलन केले नाही. त्यामुळे अद्याप कारखान्यांनी एफआरपीच्या रकमाही दिलेल्या नाहीत. त्यामुळे जयंत पाटील यांच्यापुढे स्वाभिमानीची ताकद तोकडीच पडणार आहे.शिंदेंनी नेतृत्व स्वीकारलेशरद पवार यांच्या सरकारमध्ये वाळव्यातून पराभूत झालेले प्रा. एन. डी. पाटील, राजारामबापू पाटील मंत्री झाले. परंतु या दोघांना पराभूत करणारे विलासराव शिंदे आमदार होऊनही मंत्रिपदाविना राहिले. आता तर शिंदे हे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत.