वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याच्या रागातून पत्नीला हॉकी स्टीकने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 17:56 IST2020-09-12T17:51:22+5:302020-09-12T17:56:14+5:30

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये त्या जखमी झाल्या असून तिच्या आई-वडिलासह मुलीलाही मारहाणीची धमकी दिली.

Wife beaten with hockey stick for not wishing happy birthday | वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याच्या रागातून पत्नीला हॉकी स्टीकने मारहाण

वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याच्या रागातून पत्नीला हॉकी स्टीकने मारहाण

ठळक मुद्देवाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याच्या रागातून पत्नीला हॉकी स्टीकने मारहाण ताराबाई रोडवरील घटना : पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा

कोल्हापूर : वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नसल्याच्या रागातून पतीने पत्नीला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये त्या जखमी झाल्या असून तिच्या आई-वडिलासह मुलीलाही मारहाणीची धमकी दिली. ही घटना ताराबाई रोडवर घडली. याबाबत जखमी मेघा अशोक जाधव (वय ३२, रा. शिवगंगा होस्टेल, ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांनी पोलिसांत तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रणव मिलिंद देशपांडे (वय २८, सध्या रा. कसबा बावडा. मूळ गाव- सरकारी घाट, रघुनाथ सदन, सांगली) व तक्रारदार मेघा जाधव हे दोघे पती-पत्नी असून दोघांत वारंवार वाद होतात.

शुक्रवारी प्रणव याचा वाढदिवस होता. त्यानिमित्त तो ताराबाई रोडवर पत्नी मेघा राहात असलेल्या तिच्या आई-वडिलांच्या घरी आला. तेथे मेघा यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, त्या रागातून त्याने आपल्या मोपेडवरील हॉकी स्टीक घेऊन मेघा यांना बेदम मारहाण करून जखमी केले.

त्यानंतर तिच्या आई-वडिलांसह मुलगीलाही मारहाणीची धमकी दिली. याबाबत जखमी मेघा जाधव यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार प्रणव देशपांडे याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 

Web Title: Wife beaten with hockey stick for not wishing happy birthday