शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

सभेत ऐनवेळी विषय का घेता, चिमुकल्या मुलीने सभापती नात्याने विचारला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 12:41 IST

‘स्थायी समिती सभेच्या कामकाजात महत्त्वाचे विषय ऐनवेळीच का घेता’ असा सवाल शुक्रवारी चिमुकल्या योगिता राजेंद्र शिंदे या विद्यार्थिनीने सभापती नात्याने स्थायी समिती सभेत विचारताच अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक असे सगळेच क्षणभर गोंधळून गेले.

ठळक मुद्देसभेत ऐनवेळी विषय का घेताचिमुकल्या मुलीने सभापती नात्याने विचारला प्रश्न

कोल्हापूर : ‘स्थायी समिती सभेच्या कामकाजात महत्त्वाचे विषय ऐनवेळीच का घेता’ असा सवाल शुक्रवारी चिमुकल्या योगिता राजेंद्र शिंदे या विद्यार्थिनीने सभापती नात्याने स्थायी समिती सभेत विचारताच अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक असे सगळेच क्षणभर गोंधळून गेले.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापती म्हणून जरगनगर येथील जरग विद्यामंदिरची विद्यार्थिनी योगिता राजेंद्र शिंदे या सातवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मान देण्यात आला.

विद्यमान सभापती संदीप कवाळे यांनी त्यांच्या कार्यालयात योगिता हिला सभापतींच्या खुर्चीत बसविले. एवढेच नाही तर आठवड्याच्या स्थायी सभेत अध्यक्ष म्हणून तिला सभागृहातील अध्यक्षांच्या खुर्चीत बसविले. संपूर्ण कामकाज तिच्या अध्यक्षतेखाली पूर्ण केले.प्रारंभी संदीप कवाळे यांनी योगिता हिला कामकाजाची माहिती दिली, आणि सभागृहात गेल्यावर काय सांगायचे याबाबत सूचना केल्या. एक वाजून दहा मिनिटांनी योगिता जेव्हा सभापती या नात्याने सभागृहात पोहोचली तेव्हा पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवकांनी उभे राहून तिचे स्वागत केले. स्वागताचा छोटासा कार्यक्रम होताच योगिता हिने सभेच्या कामकाजास सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या.नगरसचिव सुनील बिद्रे यांनी विषयपत्रिकेवरील विषय वाचून दाखविले. त्यानंतर योगिताने पहिलाच प्रश्न महिला दिनाच्या अनुषंगाने विचारला. रविवारी महिला दिन असून, महापालिकेने कार्यक्रमाचे कसे नियोजन केले आहे, याची माहिती द्या, अशी सूचना तिने केली. त्यावर उपायुक्त निखील मोरे यांनी खुलासा केला.नगरसचिवांनी ऐनवेळचे विषय वाचल्यानंतर योगिता हिने ऐनवेळचे विषय म्हणजे काय आणि ते ऐनवेळीच का घेतले जातात, अशी विचारणा केली. या अनपेक्षित सवालामुळे अधिकारी, नगरसेवक काहीसे गडबडले. ज्यांची जबाबदारी होती त्यांनाही उत्तर देता आले नाही. शेवटी लेखापरीक्षक संजय सरनाईक यांनी काही विषयावर तातडीने निर्णय घ्यावे लागतात. म्हणून ते ऐनवेळचे विषय म्हणून सभेत चर्चेला घेतले जातात, असे सांगितले.हीरक महोत्सव स्वच्छता अभियानात सर्व नगरसेवकांनी तसेच शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन योगिता हिने केले. तिच्या हस्ते कंटेनरमुक्त प्रभाग संकल्पना राबविणाऱ्या आरोग्य निरीक्षक, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सभापती या नात्याने योगिता हिचा कार्यालय व सभागृहातील प्रवेश चर्चेचा आणि औत्सुक्याचा राहिला. यावेळी तिच्या सोबत प्रशासन अधिकारी व शिक्षक आले होते.

 

टॅग्स :WomenमहिलाMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर