शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

Lok Sabha Election 2019 शिरोळमधून मताधिक्य कोणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:25 PM

संदीप बावचे लोकमत न्यूज नेटवर्क शिरोळ : घरच्या मैदानावर खासदार राजू शेट्टी यांना शेवटपर्यंत जखडून ठेवण्याची खेळी शिवसेना-भाजप युतीच्या ...

संदीप बावचेलोकमत न्यूज नेटवर्कशिरोळ : घरच्या मैदानावर खासदार राजू शेट्टी यांना शेवटपर्यंत जखडून ठेवण्याची खेळी शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांनी केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि शेतीमालाला दीडपट हमीभाव यासह सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे प्रश्न घेऊन खासदार शेट्टी निवडणुकीत उतरले होते. तर महायुतीने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे हा मुद्दा घेऊन खा. शेट्टी यांच्यावर टीकेची झोड उठवून कोणत्याही परिस्थिती खा. शेट्टी यांना हॅट्ट्रिक करू द्यायची नाही, यासाठीही कंबर कसली होती. एकूणच शिरोळ तालुक्यातून मताधिक्याची बाजी महाआघाडी की महायुती मारणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.सन २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत शिरोळ तालुक्यातून ७६ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत ७३ टक्के मतदान झाले. तीन टक्क्यांनी मतदानाचा टक्का घसरला असला तरी गतनिवडणुकीपेक्षा १३ हजार अधिक मतदान झाले आहे. गेल्या दोन निवडणुकीत तालुक्यातून शेट्टी यांना लीड मिळाले आहे. तालुक्यात शेट्टी यांना विरोधकांनी शेवटपर्यंत घेरण्याचा प्रयत्न केला. ऊस व दूध आंदोलनातून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर तालुक्यात खा. शेट्टी यांनी घेतलेल्या सभा लक्षवेधी ठरल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करून विरोधकांना प्रत्युत्तर दिले. धैर्यशील माने यांच्यासाठी शिवसेना-भाजपकडून गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा राबविली. तर खा. शेट्टी यांच्या बाजूने स्वाभिमानीसह काँग्रेसचे गणपतराव पाटील, राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, छत्रपती ग्रुप यासह घटक पक्षांनी प्रचार यंत्रणा राबविली. निवडणुकीत जातीय समीकरणाचा मुद्दा अधिक गाजला. वंचित आघाडीला मिळणाºया मतावरही विजयाची गणिते अवलंबून आहेत. या निवडणुकीत एकूणच ही निवडणूक नेत्यांच्या प्रतिष्ठेची बनली असून, लोकसभेच्या निकालावरच विधानसभेचे चित्र राहणार आहे.मतदारसंघातील सभाया मतदारसंघात खा. शेट्टी यांच्यासाठी राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अभिनेते प्रकाश राज, आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री हसन मुश्रीफ, रविकांत तुपकर यांनी, तर धैर्यशील माने यांच्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, लक्ष्मण वडले यांनी सभा घेतल्या. खा. शेट्टींच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जयसिंगपूर येथे भेट दिली होती. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पदयात्रा व मोटारसायकल रॅलीने शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक