वडिलांच्या गाडीला धडकून चिमुकली ठार, कोल्हापूर जिल्ह्यात घडली दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 12:54 IST2023-12-14T12:49:53+5:302023-12-14T12:54:06+5:30
गडहिंग्लज : चारचाकी वळविताना अचानक पाठीमागून धावत आलेल्या बालिकेचा गाडीवर आदळल्याने मृत्यू झाला. क्रिशिका अमित रामपुरे (वय दीड वर्षे, ...

वडिलांच्या गाडीला धडकून चिमुकली ठार, कोल्हापूर जिल्ह्यात घडली दुर्दैवी घटना
गडहिंग्लज : चारचाकी वळविताना अचानक पाठीमागून धावत आलेल्या बालिकेचा गाडीवर आदळल्याने मृत्यू झाला. क्रिशिका अमित रामपुरे (वय दीड वर्षे, रा. निलजी, ता. गडहिंग्लज) असे दुर्दैवी मृत बालिकेचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, निलजीकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यापासून काही अंतरावर अमित रामपुरे यांचे घर आहे. ते शेतीबरोबरच चारचाकी वाहन भाडोत्री देण्याचा व्यवसाय करतात. बुधवारी (दि. १३) दुपारी १२ च्या सुमारास घरानजीकच्या रस्त्यावर गाडी मागे घेऊन ते वळवून घेत होते. दरम्यान, अचानकपणे वडिलांकडे धावत आलेली क्रिशिका त्यांच्या गाडीवर आदळली. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
उपचारासाठी तिला येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे आणताना वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी-आजोबा असा परिवार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वर्दीवरून घटनेची पोलिसात नोंद झाली आहे.