शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: चक्कर येऊन पडताच कारागिराची चांदीची पिशवी चोरट्याकडून लंपास, सात लाखांच्या ९८ मूर्तींची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 11:58 IST

१० दिवसांनी फिर्याद नोंद

Kolhapur Crime: भेंडे गल्ली येथील सराफांना चांदीच्या मूर्ती देण्यासाठी जाताना जुना वाशी नाका येथे रंकाळ्याजवळ चक्कर येऊन पडताच कारागिराच्या मोपेडवरील ९८ मूर्ती असलेली पिशवी चोरट्याने लंपास केली. हा प्रकार २४ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडला. याबाबत कारागीर सर्जेराव विठ्ठल लव्हटे (वय ३६, रा. बोंद्रेनगर, कोल्हापूर) यांनी शनिवारी (दि. ४) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भेंडे गल्ली येथील एका सराफाने कारागीर लव्हटे यांना गणपती आणि लक्ष्मीच्या लहान-मोठ्या आकाराच्या चांदीच्या ९८ मूर्ती तयार करण्याची ऑर्डर दिली होती. तयार झालेल्या सर्व मूर्ती कापडी पिशवीत घेऊन त्या पोहोच करण्यासाठी २४ सप्टेंबरला दुपारी ते घरातून बाहेर पडले. क्रशर चौकापासून पुढे गेल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. मोपेड चालवतानाच त्यांना जुना वाशी नाक्याजवळ चक्कर आली. मोपेडची गती कमी करून रस्त्याच्या कडेला थांबण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी रंकाळ्याच्या लोखंडी रेलिंगला मोपेड धडकून ते पडले. त्यांना उठवण्यासाठी गर्दी जमली होती. काही वेळाने त्यांना मोपेडवरील चांदीच्या मूर्ती ठेवलेली पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यात सात लाख १० हजार रुपये किमतीच्या गणपतीच्या ४९ आणि लक्ष्मीच्या ४९ मूर्ती होत्या.खात्री करण्यात दहा दिवस गेलेचोरीची घटना घडल्यानंतर लव्हटे फिर्याद देण्यासाठी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गेले होते. मात्र, त्यांनी बनाव केला असावा, अशी पोलिसांना शंका आली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर फिर्याद नोंदवून घेऊ, असे पोलिसांनी त्यांना सांगितले. त्यानंतर चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Artisan faints, silver idols worth ₹7 lakh stolen.

Web Summary : In Kolhapur, an artisan lost ₹7.1 lakh worth of silver idols after fainting near Rankala lake. While transporting 98 idols to a jeweler, he collapsed; a thief stole the bag. Police are investigating the theft using CCTV footage.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस