तुझी जात कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते रे भाऊ..?, आजपासून राज्यभरात मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण

By विश्वास पाटील | Published: January 23, 2024 11:11 AM2024-01-23T11:11:54+5:302024-01-23T11:12:16+5:30

विश्वास पाटील  कोल्हापूर : तुमची जात कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते का..? कुंटुंबात कोण आजारी पडले तर त्यास लवकर ...

Which caste is considered inferior to your caste, Maratha and open category survey across the state from today | तुझी जात कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते रे भाऊ..?, आजपासून राज्यभरात मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण

तुझी जात कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते रे भाऊ..?, आजपासून राज्यभरात मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्व्हेक्षण

विश्वास पाटील 

कोल्हापूर : तुमची जात कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते का..? कुंटुंबात कोण आजारी पडले तर त्यास लवकर आराम पडावा म्हणून दृष्ट काढणे, अंगारा लावणे, गंडा बांधणेच आदी प्रकार करता काय अशी विचारणा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने आज मंगळवारपासून राज्यभरात होणाऱ्या मराठा व इतर खुल्या प्रवर्गातील सर्व्हेक्षणात केली जाणार आहे. 

माध्यमिक, प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक आणि परिचारिकांच्या मदतीने हे सर्व्हेक्षण ३० जानेवारीपर्यंत संपवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केल्याने शासनाने हे सर्व्हेक्षणाचे काम युध्दपातळीवर हाती घेतले आहे. या प्रश्र्नांवलीमध्ये मुलभूत माहिती, कौटुंबिक प्रश्र्न, आर्थिक, सामाजिक स्थिती, आरोग्य विषयक माहिती संबंधित प्रश्र्न आहेत. त्याशिवाय कुटुंबातील सदस्यांची माहिती व शिक्षण स्थितीचे तक्ते भरून ध्यायचे आहेत. ही प्रश्र्नावली कुटुंबप्रमुखाकडून भरून घेतली जाणार आहे. त्यात खोटी किंवा चुकीची माहिती दिल्यास त्याच्या परिणामास तुम्ही जबाबदार राहाल असाही इशारा दिला आहे. त्याची सही, अंगठाही घेतला जाणार आहे.

तुमच्या समाजात लग्नामध्ये हुंडा देण्याची पध्दत आहे का, विधवा स्त्रियांना कुंकु लावण्याची, मंगळसुत्र घालण्याची परवानगी आहे का, विधूर पुरुषांचे आणि विधवांचे पुर्नविवाह होतात का, विधवांना शुभकार्यात बोलवले जाते का, त्यांना हळदीकुंकवाचा मान दिला जातो का, विवाहित स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असे बंधन आहे का, मुलीचा विवाह कुणाबरोबर करायचा याचा निर्णय कोण घेते असे प्रश्र्न विचारण्यात आले आहेत. तुमच्या समाजात पहिले अपत्य मुलगाच झाला पाहिजे अशी मानसिकता आहे का अशी विचारणा ही प्रश्र्नावली करते. नवसाला कोंबड्या-बकऱ्याचा बळी देण्याची पध्दत आहे का असेही त्यामध्ये विचारले आहे.

सर्व्हेक्षणात कुटुंबातील कुणाला कुत्रा-माकड, साप-विंचू चावल्यावर किंवा कावीळ झाल्यावर कुणाकडे उपचाराला घेवून जाता या प्रश्र्नांला पहिला पर्याय तांत्रिक-मांत्रिकाचा दिला आहे. दुसरा पर्याय घरगुती उपचार आणि तिसरा पर्याय डॉक्टरचा दिला आहे. आयोगाला लोकांनी तांत्रिक-मांत्रिकाकडे जावे असे वाटते की काय अशीही विचारणा त्यामुळे झाली.

१५४ प्रश्न विचारणार

सर्वेक्षणात १५४ प्रश्र्न, तीन तक्ते व तब्बल ३५ पानांची प्रश्र्नांवली आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्यातील अनेक प्रश्र्न आरक्षण राहिले बाजूलाच, नवे वाद निर्माण करणारे आहेत.

Web Title: Which caste is considered inferior to your caste, Maratha and open category survey across the state from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.