शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

सोन्या कुठे आहेस रे....आईची आर्त हाक, ‘त्या’ दोघा युवकांचा अद्याप ठावठिकाणा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 2:53 PM

पंचगंगा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या सत्यजित शिवाजी निकम (वय २०, रा. तोरस्कर चौक) या महाविद्यालयीन मुलाचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही.

ठळक मुद्देसोन्या कुठे आहेस रे....आईची आर्त हाकपुरातून वाहून गेलेल्या ‘त्या’ दोघा युवकांचा अद्यापही ठावठिकाणा नाही

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या सत्यजित शिवाजी निकम (वय २०, रा. तोरस्कर चौक) या महाविद्यालयीन मुलाचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही.

गेले आठ दिवस त्याचे आई-वडील ‘सोन्या’ सुखरूप घरी परत येऊ दे, म्हणून देवाला प्रार्थना करीत आहेत. त्याची आई तर ‘सोन्या, कुठे आहेस रे बाळा...’ म्हणून अश्रू ढाळत आहे. त्याच्या ओढीने कुटुंब रात्री अन्नपाण्याशिवाय जागून काढत आहेत.अंघोळीसाठी गेलेल्या तोरस्कर चौकातील सत्यजित निकम याने पोहण्यासाठी दि. १५ जुलैला पुलावरून पाण्यात उडी मारली तो पाण्याच्या वाहत्या प्रवाहातून वाहून गेला. त्याच दिवशी शिवाजी पुलावरून तीस वर्षांच्या युवकाने पुराच्या पाण्यात उडी मारली आणि तो बेपत्ता झाला.

या दोघांचा पोलीस प्रशासनासह रेस्क्यु पथक, आपत्कालीन पथकाद्वारे शोध मोहीम सुरू आहे. गेली आठ दिवस धुवाधार पावसात शोधमोहीम राबवली जात आहे. नदी परिसरातील झाडे, झुडपे पिंजून काढली; परंतु हाती दोघांचेही मृतदेह लागले नाही.

पाण्याची पातळी आता कमी होत आहे; त्यामुळे बुडालेले युवक दूरपर्यंत वाहत गेले असावेत असा अंदाज घेत शोध मोहीम शिये पंचगंगा नदी पुलापर्यंत राबविली असता त्यांचा शोध लागला नाही.घरातून बोलत-चालत बाहेर पडलेला मुलगा सत्यजित महापुरात वाहून गेल्याने आई, वडील व नातेवाईक यांना धक्काच बसला आहे. आई तर ‘सोन्या, कुठे आहेस रे बाळा...’ म्हणून अश्रू ढाळत आहे. शेजारील महिला त्यांना सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गेले आठ दिवस ते सोन्या सुखरूप घरी परत येऊ दे, म्हणून देवाला प्रार्थना करीत आहेत. अजूनही त्यांना तो जिवंत असलेली भाबडी आशा आहे. त्याच्या ओढीने कुटुंब रात्री अन्नपाण्याशिवाय जागून काढत आहे. हातातोंडाला आलेला एकुलता सोन्या अचानक गायब झाल्याने निकम कुटुंबीय पूर्णत: हतबल झाले आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसriverनदीkolhapurकोल्हापूर