शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील ‘सीपीआर’मधील आठ इमारतींच्या कामांचा मुहूर्त कधी?, किती कोटी मंजूर, कोणती कामे अपुर्ण.. जाणून घ्या

By भीमगोंड देसाई | Updated: March 17, 2025 16:53 IST

भीमगोंडा देसाई  कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ‘सीपीआर’मध्ये मंजूर असलेल्या आठ विभागांच्या इमारतींच्या कामांना अजून श्रीगणेशा झालेला नाही. या ...

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ‘सीपीआर’मध्ये मंजूर असलेल्या आठ विभागांच्या इमारतींच्या कामांना अजून श्रीगणेशा झालेला नाही. या विभागात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परिणामी नूतनीकरण, दुरुस्तीची कामे करण्यासाठी ठेकेदारांच्या ताब्यात आठ इमारती मिळालेल्या नाहीत. आतापर्यंत चार विभागांच्या इमारतींच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे; पण अजून बहुतांश कामे अपूर्ण असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. परिसरात मोठ्या संख्येने पार्किंग करण्यात येणाऱ्या खासगी वाहनांमुळे कामात अडथळा येत आहे.‘सीपीआर’मध्ये मार्च २०२४ पासून विविध विकासकामे केली जात आहेत. रुग्णालय पूर्णपणे रिकामे करून कामे केले असते तर गतीने झाले असते; पण रुग्णांवर उपचार करण्यासाठी पर्यायी मोठी इमारत नसल्याने एकाचवेळी दुरुस्तीची कामे आणि रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परिणामी रुग्णांना अनेक अडचणींना, गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. परिसरातील रस्ते करण्यासाठी खोदाई केल्याने पाणी आणि ड्रेनेजच्या पाइपलाइन्स फुटल्या आहेत.एका इमारतीमधील विभागातून दुसऱ्या इमारतीमधील विभागात स्ट्रेचरवरून रुग्ण घेऊन जाताना नातेवाईक, कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. यामुळे कामे गतीने करावीत, अशी मागणी होत आहे; पण रुग्णांवर उपचार सुरू असल्याने आठ विभागांच्या इमारतीमध्ये कामे सुरू करता आलेली नाहीत. दुरुस्तीची कामे सौरभ कन्स्ट्रक्शन, पुणे आणि रस्त्याची कामे कागलचे राजू इनामदार हे ठेकेदार करत आहेत.

अजून कामे सुरू न झालेले विभाग : बर्न, आय, ऑपरेशन थिएटर, मुख्य इमारत, ब्लड बँक, लायब्ररी, जुना अपघात, कोयना इमारत.

ही कामे झाली पूर्णमुख्य इमारत आणि बाह्यरुग्ण विभागासमोरील रस्ते, कैदी वॉर्ड, कान, नाक, घसा इमारत, मेंटल वॉर्ड इमारत.

दृष्टिक्षेपातील सीपीआर

  • वर्ष १८८४ पासून रुग्णांच्या सेवेत
  • रुग्णालय १० एकरांत आहे.
  • एकूण ३३ इमारती असून, ४१ हजार ५७८ चौरस मीटर इमारतीचे क्षेत्रफळ आहे.
  • रोज १५०० ते १७०० रुग्णांवर उपचार.

कोणत्या कामांसाठी किती निधी?

  • इमारत दुरुस्ती : ३१ कोटी ९८ लाख
  • रस्ते दुरुस्ती : ७ कोटी ९५ लाख
  • विद्युत दुरुस्ती : ३ कोटी ८ लाख

कोणत्या इमारतीचे किती टक्के कामदूधगंगा : ७०, वेदगंगा : २५, बाह्यरुग्ण विभाग : ४०, नर्सिंग मुलींचे वसतिगृह ७५, तुळशी १५ टक्के, एनआयसीयू २०, कृष्णा १०, एचईआर ३०

कोणती कामे सुरू आहेत?

  • १९ इमारतींची दुरुस्ती, नूतनीकरण.
  • ड्रेनेजलाइनचे बांधकाम करणे.
  • पाणीपुरवठ्यासाठीचे पाइपलाइन करणे.
  • रस्ते काँक्रीटीकरण करणे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय