शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

निरुपयोगी प्लास्टिकचे करायचे काय?, कचरावेचक महिलांसमोर प्रश्न : महापालिका उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 2:38 PM

कोल्हापूर : कायद्याच्या धाकाने कोल्हापूर महानगरपालिकेने कचऱ्याचे वर्गीकरण सुरू केले खरे; पण त्यानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच ...

ठळक मुद्देनिरुपयोगी प्लास्टिकचे करायचे काय?कचरावेचक महिलांसमोर प्रश्न : महापालिका उदासीन

कोल्हापूर : कायद्याच्या धाकाने कोल्हापूर महानगरपालिकेने कचऱ्याचे वर्गीकरण सुरू केले खरे; पण त्यानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती दिसत आहे. विशेषत: प्लास्टिकच्या कचऱ्याच्या निर्गतीकरणाविषयी ठाम भूमिका घेतली जात नसल्याने या कचऱ्यांचे करायचे काय? असा प्रश्न कचरावेचक महिलांना पडला आहे. प्लास्टिकचा हा कचरा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वापरण्याबाबतची महापालिकेची घोषणा कागदावरच उरली आहे.कोल्हापुरात कचऱ्याचे उग्र स्वरूप धारण केल्यानंतर ८ एप्रिल २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन पथदर्शी प्रकल्प हाती घेतला. यात ओल्या कचऱ्यांपासून खत आणि वीजनिर्मितीसह प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर रस्ते बांधकामासाठी करण्याचा पर्याय पुढे आला.

‘एकटी’ संस्थेने यात पुढाकार घेऊन, कचरा वेचणाऱ्या महिलांचे बचतगट स्थापन करून, त्यांच्यामार्फत शहरातील कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण सुरू केले.कोल्हापूर शहरात तब्बल ८० टन कचरा प्लास्टिकचा असतो. एकूण कचरा १९० टन होतो. त्यात ११० टन कचरा हा ओला असतो. यापासून सध्या खतनिर्मिती व वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे; पण सर्वांत जास्त अडचण आहे ती प्लास्टिकच्या कचऱ्याच्या निर्गतीकरणाची; पण येथे महापालिकेची उदासीन भूमिका आडवी येत आहे.

सातत्याने विचारणा करूनही या कचरावेचक महिलांना या प्लास्टिकचे काय करायचे, हे सांगितले जात नाही. वर्गीकरण केल्यानंतर प्लास्टिकचे तुकडे करण्यासाठी महापालिकेने एक शेल्डर मशीन पुरविले आहे. ते शिरोली नाका येथे सध्या कार्यरत आहे.

एक महिला दिवसाला २० ते २५ किलो प्लास्टिकचे तुकडे करते. ते एकत्रित करून ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे द्यायचे आहेत. बांधकाम विभाग रस्ते करण्यासाठी त्यांचा वापर करणार आहे; पण महापालिकेने या महिलांकडून प्लास्टिक घेण्यासाठी दराचाही करार अद्याप केलेला नाही. दरही नाही, कचराही घेतला जात नाही; मग रोज तुकडे केलेल्या कचऱ्याचे करायचे तरी काय, असा प्रश्न या महिलांना पडला आहे....म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे धावप्लास्टिकच्या कचऱ्यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडेही ‘एकटी’ संस्थेतर्फे सातत्याने विचारणा केली जात आहे; पण कोणतेही उत्तर मिळत नसल्याने आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडेच या संदर्भात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे, असे ‘एकटी’ संस्थेचे जैनुद्दीन पन्हाळकर यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका