Western Maharashtra should lend a helping hand to farmers in Marathwada: MP Sambhaji Raje | मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राने मदतीचा हात द्यावा : खासदार संभाजीराजे

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राने मदतीचा हात द्यावा : खासदार संभाजीराजे

ठळक मुद्देमराठवाड्यातील शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राने मदतीचा हात द्यावा : खासदार संभाजीराजे सरकारने लवकर नुकसानभरपाई द्यावी

कोल्हापूर : गेल्यावर्षी महापुरावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला मराठवाडा, विदर्भातील नागरिकांनी मदत केली होती. आता मराठवाडा, खान्देश, विदर्भात अतिवृष्टीमुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना पश्चिम महाराष्ट्राने मदतीचा हात द्यावा, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले.

 मराठवाडा, विदर्भ, खान्देश, आदी परिसरात अतिवृष्टीमुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याआधी कोरोनाचा फटका त्यांना बसला आहे. त्यांची स्थिती लक्षात घेऊन या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने नुकसानभरपाई द्यावी. या अतिवृष्टीच्या भागाच्या पाहणीसाठी लवकरच जाणार आहे. असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

Web Title: Western Maharashtra should lend a helping hand to farmers in Marathwada: MP Sambhaji Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.