मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राने मदतीचा हात द्यावा : खासदार संभाजीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:37 IST2020-10-16T13:35:42+5:302020-10-16T13:37:47+5:30
rain, farmar, marathwada, Sambhaji Raje Chhatrapati, kolhapurnews गेल्यावर्षी महापुरावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला मराठवाडा, विदर्भातील नागरिकांनी मदत केली होती. आता मराठवाडा, खान्देश, विदर्भात अतिवृष्टीमुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना पश्चिम महाराष्ट्राने मदतीचा हात द्यावा, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्राने मदतीचा हात द्यावा : खासदार संभाजीराजे
कोल्हापूर : गेल्यावर्षी महापुरावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला मराठवाडा, विदर्भातील नागरिकांनी मदत केली होती. आता मराठवाडा, खान्देश, विदर्भात अतिवृष्टीमुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना पश्चिम महाराष्ट्राने मदतीचा हात द्यावा, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले.
मराठवाडा, विदर्भ, खान्देश, आदी परिसरात अतिवृष्टीमुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याआधी कोरोनाचा फटका त्यांना बसला आहे. त्यांची स्थिती लक्षात घेऊन या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने नुकसानभरपाई द्यावी. या अतिवृष्टीच्या भागाच्या पाहणीसाठी लवकरच जाणार आहे. असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.