फटाके वाजवून मुलीचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST2021-04-04T04:24:08+5:302021-04-04T04:24:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क : मुलगी झाली असे म्हणताच एरव्ही नाक मुरडणारे परिसरातील पालक आपण पाहतो; पण माणगाव येथील ...

Welcome the girl with fireworks | फटाके वाजवून मुलीचे स्वागत

फटाके वाजवून मुलीचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क : मुलगी झाली असे म्हणताच एरव्ही नाक मुरडणारे परिसरातील पालक आपण पाहतो; पण माणगाव येथील विकी सगरे व मोनिका सगरे यांना कन्या झाल्याच्या प्रीत्यर्थ तिचे स्वागत फटाके वाजवून व घर सुशोभीकरण करून करण्यात आले. कन्याप्राप्तीच्या केलेल्या स्वागताची चर्चा दिवसभर परिसरात सुरू होती.

मुलींचा जन्मदर घटत असून मुलींपेक्षा मुलगा हवा या अट्टाहासापोटी मुली नको ही भावना पालकांची वाढत आहे. मुलगी होणार ही गोष्ट कळाली की मुलीला गर्भात मारण्याच्या घटना अजूनही घडत आहेत. लिंग तपासणीसाठी कर्नाटक सीमा भाग तसेच बरेच ठिकाणी अनधिकृत गर्भलिंग तपासणी केंद्र जोमात सुरू आहेत. मुलगी नको; पण वंशाला दिवा हवा या अट्टाहासापोटी मुलाला जन्म देण्याचा प्रकारामुळे मुलीची संख्या विषम होत आहे. माणगाव येथील शिवभक्त व गडकोट किल्ल्याचे अभ्यासक, उद्योजक विकी सगरे व मोनिका सगरे या दाम्पत्याने दुसऱ्या कन्येला जन्म दिला. या जन्मलेल्या मुलीचे स्वागत प्रवेशद्वारावर रांगोळी, आकर्षक रोषणाई, फुलांच्या पायघड्या घालून केले.

विशेष म्हणजे सगरे दाम्पत्य यांना पहिली मनवा ही कन्या असून, दुसऱ्या कन्येचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले, याची चर्चा परिसरात होत होती.

Web Title: Welcome the girl with fireworks