शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदाची चर्चा आता आम्ही थांबवली

By admin | Updated: January 24, 2015 00:18 IST

खासदार शेट्टी यांचा उद्वेग : संघटना मंत्रिपदासाठी काढली का..?

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळेल की नाही यासंबंधीची चर्चा आम्ही आता थांबवली असल्याची उद्वेगजनक प्रतिक्रिया संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. पत्रकारांनी त्यांना यासंबंधी वारंवार विचारणा केल्यावर ‘मंत्रिमंडळात जायला मिळेल म्हणूनच आम्ही संघटना काढली का...?’ अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संघटनेची भाजपला चांगली मदत होऊनही सत्ता आल्यानंतर मात्र भाजपने संघटनेला ठेंगा दाखविला आहे. जिल्हा नियोजन मंडळावरही संघटनेच्या एकाही कार्यकर्त्याला भाजपने संधी दिलेली नाही. ऊसदराच्या प्रश्नांत राज्य सरकार काहीच निर्णय घ्यायला तयार नसल्याने संघटनेने गेल्या आठवड्यात पुण्यात साखर आयुक्त कार्यालयाची तोडफोड केली. त्याचा परिणाम म्हणून भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीत संघटनेच्या सदाभाऊ खोत यांचा पत्ता ‘कट’ केला. त्याअनुषंगाने प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज खासदार शेट्टी यांना पत्रकारांनी गराडा घातला परंतु ते आज बोलण्याच्या मूडमध्ये नव्हते.ते म्हणाले,‘आम्हाला मंत्रिपद मिळेल की नाही यासंबंधीची चर्चा आम्ही आता थांबवली आहे. माझ्यासह कोणताच सहकारी आता याविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. आम्ही यापुढे फक्त शेतकऱ्यांच्याच प्रश्नांसंबंधी बोलण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्तरानंतरही पुन्हा पुण्यातील आंदोलन व विधानपरिषदेची हुकलेली संधी याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले. त्यावर कॅमेऱ्यापासून बाजूला होत त्यांनी ‘मंत्रिमंडळात जाण्यासाठीच आम्ही संघटना काढली का...?’ असा प्रतिप्रश्न केला. नियोजन समितीच्या बैठकीतही मित्रपक्ष असलेले खासदार शेट्टी हे व्यासपीठाच्या एका बाजूला बसून होते. कामकाजातही त्यांनी फारसा उत्साही सहभाग दाखविला नाही. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उजव्या बाजूला ‘राष्ट्रवादी’चे खासदार धनंजय महाडिक हे बसले होते.