शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही लस घेतली, तुम्हीही घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:45 IST

कोल्हापूर : आम्ही लस घेतली, तुम्हीही घ्या, असे प्रत्यक्ष कृतीद्वारे सांगत ज्येष्ठ नागरिकांनी कोविड लस रांगा लावून बुधवारी टोचून ...

कोल्हापूर : आम्ही लस घेतली, तुम्हीही घ्या, असे प्रत्यक्ष कृतीद्वारे सांगत ज्येष्ठ नागरिकांनी कोविड लस रांगा लावून बुधवारी टोचून घेतली. शहरासह जिल्ह्यातील १२० सरकारी केंद्रांवर गर्दीचे चित्र दिवसभर होते. यामुळे कोविड लसीकरणाच्या पहिल्या दोन टप्प्यांत अनुत्साह अनुभवणाऱ्या लसीकरण यंत्रणेची तिसऱ्या टप्प्यात मात्र पहिल्याच दिवसापासून मरगळ झटकली गेली आहे. चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आरोग्य यंत्रणाही वेगाने कामाला लागली आहे.

जिल्ह्यातील ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० या वगोगटातील व्याधीग्रस्त हा तिसरा टप्पा निश्चित करून लसीकरणास सुरुवात झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सूचना दिल्यानंतर बुधवारपासून या लसीकरण मोहिमेने अधिक गती घेतली. गावोगावी आशा कर्मचाऱ्यांच्या मार्फत प्रबोधन करण्याबरोबरच ज्येष्ठांना केंद्रात घेऊन येण्यासाठीची यंत्रणाही आरोग्य विभागाने लावली आहे. नोंदणीसाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्यात आली असून, तेथे नोंदणी होईल, त्याप्रमाणे लस टोचून घेण्यासाठी बोलावले जात आहे.

स्वत:च नोंदणी करून घेत व्याधीग्रस्त व ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर रांगा लावून लस टोचून घेत आहेत. सरकारी दवाखान्यात मोफत, तर खासगी दवाखान्यात २५० रुपये घेऊन ही लस टोचली जात आहे. मोफत असल्याने सरकारी केंद्राबाहेर गर्दी दिसत आहे. लस घेतलेल्यांना पुन्हा २८ दिवसांनी दुसरी लस दिली जाणार असल्याने पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबरसह सर्व माहिती रजिस्टरमध्ये भरून घेतली जात होती. केंद्रावर एकाच वेळी गर्दी झाल्याने किमान अर्धा ते तासभर प्रतीक्षा करत बसावे लागत होते. केंद्रावर मास्क, सॅनिटायझरची दक्षता घेतली जात होती. लसीकरण झाल्यानंतर अर्धा तास विश्रांतीचीही सोय करण्यात आली होती.

चौकट ०१

काळजी घेण्याचे आवाहन

लस दिल्यानंतर अर्धा तास केंद्रावरच बसवून घेतले जात होते. परत जाताना रात्री ताप आलाच तर खाण्यासाठी म्हणून चार गोळ्याचे पाकीट दिले जात होते.

बॉक्स ०१

६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक : ५ लाख ९ हजार

व्याधीग्रस्त नागरिक : १ लाख ५२ हजार

प्रतिक्रिया ०१

मी ६५ वर्षांची आहे. मुलांनी आधीच ऑनलाईन नोंदणी केली असल्याने अर्ध्या तासातच मला लस दिली. साधे इंजेक्शन दिल्याप्रमाणेच दुखले. काही त्रास जाणवला नाही.

सीमा सामानगडकर, महालक्ष्मीनगर

प्रतिक्रिया ०२

मी ७४ वर्षांचा आहे. शेजाऱ्याच्या मदतीने सीपीआरमध्ये लसीकरणासाठी आलो. लस टोचली. काही त्रास जाणवला नाही. न घाबरता सर्वांनीच लस टोचून घ्यावी.

मुरारजी शहा, शनिवार पेठ

प्रतिक्रिया ०३

फोटो : ०३०३२०२१-कोल-दीपा मगदूम लसीकरण

लसीकरणासाठी सामान्य जनतेने पुढे यावे यासाठी मी स्वत: महापालिकेच्या फिरंगाई रुग्णालयात जाऊन लस घेतली. कोरोनाच्या संसर्गातून वाचण्यासाठी लस हे कवच आहे.

दीपा मगदूम

माजी नगरसेविका कोल्हापूर.

फोटो: ०३०३२०२१-कोल- लसीकरण ०१

फोटो ओळ : सीपीआरमधील लसीकरण केंद्रावर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. लस टोचून घेतल्यानंतर ज्येष्ठ महिलेला सेल्फी पॉईंटवर फोटो काढून घेण्याचा मोह आवरला नाही.

(छाया : आदित्य वेल्हाळ)

फोटो: ०३०३२०२१-कोल- लसीकरण ०२

फोटो ओळ : सीपीआरमध्ये लस टोचून घेतल्यानंतर अर्धा तास सक्तीची विश्रांती घ्यावी लागत असल्याने अशाप्रकारे स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्यात आली होती.

(छाया : आदित्य वेल्हाळ)