शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आठ दिवस पाणीपुरवठा ठप्प, संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना कोंडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:35 IST

कुरुंदवाड : पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून शेतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. ...

कुरुंदवाड : पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाल्याने गेल्या आठ दिवसांपासून शेतीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पाण्याअभावी पिके वाळत असल्याने शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्यांनी कुरुंदवाड पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांना कोंडून घातले.पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी शशांक शिंदे आल्यानंतर व बुधवारपर्यंत पंचगंगा नदीपात्रातील पाणीपातळी ३० फूट करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर अधिकाऱ्यांची सुटका केली. जयहिंद सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष दस्तगीर बाणदार यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.दरम्यान, बुधवारपर्यंत पाणीपातळी योग्य न झाल्यास पाटबंधारे अधिकाऱ्यांना पुन्हा कोंडून कार्यालयासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. तेरवाड बंधाऱ्यावर पंचगंगा पाणीपातळी २७ फुटांच्या खाली गेल्याने या नदीवरील खासगी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे विद्युतपंप उघडे पडले आहेत. कार्यालयाकडे वारंवार तक्रार करूनही अधिकारी निष्काळजीपणा करत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी पाटबंधारे शाखा कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले.कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सुमित डोंगळे, कार्यालयीन लिपिक एस. जी. शिंदे यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने शेतकऱ्यांनी कार्यालयाला कडी घालून अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोंडले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दुपारी येथील पाटबंधारे कार्यालयातील उपविभागीय अधिकारी शशांक शिंदे आल्याने बाणदार यांच्यासह शेतकऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत धारेवर धरले. सुमारे एक तासांच्या वादळी चर्चेनंतर अधिकारी शिंदे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर पाटबंधारे कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुटका केली.आंदोलनात सरपंच भास्कर कुंभार, अरुण शिंगे, डॉ. संदीप नागणे, अर्जुन बेबडे, शाहीर बाणदार, मोरा भंडारे, सुधाकर खोत, उत्तम शिंदे, भाऊसाहेब चौधरी, अस्लम मुजावर यांच्यासह शिरढोण, अब्दुललाट येथील शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीWaterपाणीagitationआंदोलन