हुश्श.. थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा सुरळीत, कोल्हापूरकरांची पाण्यासाठीची धावाधाव थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 18:45 IST2025-09-01T18:44:13+5:302025-09-01T18:45:35+5:30

चौथ्या दिवशी पूर्ण क्षमतेने पाणी

Water supply resumes in Kolhapur city on fourth day after pipeline project fails | हुश्श.. थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा सुरळीत, कोल्हापूरकरांची पाण्यासाठीची धावाधाव थांबली

हुश्श.. थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा सुरळीत, कोल्हापूरकरांची पाण्यासाठीची धावाधाव थांबली

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील बिघाड पूर्णपणे निघाल्याने चौथ्या दिवशी शहरात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू झाला. अपवादवगळता शहरातील सर्व भागांत पाणी पूर्ण दाबाने वितरीत होत असल्याची माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या प्रशासनाने रविवारी दिली.

थेट पाईपलाईनच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने ऐन गणेशोत्सवात शहरात पाणीबाणी निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी महिला, रहिवाशांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले. तातडीने प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त कपिल जगताप, जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी जादा कर्मचारी तैनात करून बिघाड काढण्याचे काम युद्धपातळीवर केले.

सूरत येथील कंपनीच्या तज्ज्ञ अभियंत्यांची मदतही घेण्यात आली. तांत्रिक दोष पूर्णपणे निघाल्याने योजनेतून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा सुरू झाला आहे. परिणामी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

शिंगणापूर रॉ वॉटर पंपिग स्टेशन येथील ३३ केव्ही सबस्टेशन दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले आहे. शिंगणापूर रॉ वॉटर पंपिग स्टेशन येथील ट्रान्सफॉर्मर हिटिंग करून पंपिग स्टेशनची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर येथूनही पाणी उपसा सुरळीतपणे सुरू झाला. परिणामी शिंगणापूरमधून ए, बी व ई वॉर्डमधील राजारामपुरी सेक्शन, बालिंगा योजनेतूनमधून सी व डी वॉर्डला आणि काळम्मावाडी योजनेमधून कसबा बावडा तसेच संलग्न ई वॉर्डाला एकाच वेळी दैनंदिन पाणीपुरवठा पूर्ववत केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

काही भागांत टँकर

आपटेनगर, जीवबा नाना पार्क, सुलोचना पार्क, साळोखेनगर परिसरात अपुरा पाणीपुरवठा झाला. येथे मागणीप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. येथेही आज, सोमवारपासून पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Web Title: Water supply resumes in Kolhapur city on fourth day after pipeline project fails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.