शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जलशुद्धीकरण केंद्राची जूनमध्ये चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:23 IST

जलशुद्धीकरण केंद्राची जूनमध्ये चाचणीभारत चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना हे कोल्हापूरकरांचे स्वप्न आहे. ...

जलशुद्धीकरण केंद्राची जूनमध्ये चाचणीभारत चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना हे कोल्हापूरकरांचे स्वप्न आहे. नैसर्गिक, भौगोलिक, प्रशासकीय तसेच मानवनिर्मित अनेक अडचणी, अडथळे पार करत योजनेचे काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरू आहे. योजनेतील सगळ्यात जलदगतीने काम पूर्ण होत आहे, ते पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्राचे! प्रतिदिन ८० एम. एल. डी. क्षमतेच्या या अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्रातील आठ ड्युअल फिल्टर बेड, ४० एम. एल. डी. क्षमतेचे दोन क्लॅरिफायर, स्काडा सिस्टीमसह काही इमारती पूर्ण झाल्या आहेत. एवढेच नाही, तर रंगरंगोटीचे कामही सुरू झाले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी घेतली जाणार आहे.ठेकेदार ‘जीकेसी’ कंपनीसमोर मुख्य आव्हान धरणक्षेत्रातील इंटकवेल, जॅकवेल, हेडवर्कचे होते. दुसरे आव्हान होते ५३ किलोमीटर अंतरात जलवाहिन्या टाकण्याचे! ही कामे प्रगतिपथावर आल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. सगळ्यात सहजगतीने पुईखडी येथे बांधण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. जलशुद्धीकरण केंद्राची जागा ही महानगरपालिका प्रशासनाच्या मालकीची असल्याने त्या ठिकाणी काम करण्यास कोणतेच अडथळे नव्हते. ही संधी साधत जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू ठेवले आणि आजमितीस ते पूर्णही झाले आहे.‘लोकमत टीम’ने या ठिकाणची पाहणी केली तेव्हा तेथील अनेक इमारतीमध्ये टाईल्स बसविण्याचे तसेच रंगरंगोटीचे काम सुरू होते. आठ ड्युअल फिल्टर बेडचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या वरील बाजूला बॅक वॉश टॅँक बांधले जात असून, त्याच्या स्लॅबच्या सळ्या जोडल्या जात आहेत. पुढील आठवड्यात त्यावर स्लॅब टाकला जाणार आहे. ४० एम. एल. डी. क्षमतेचे क्लॅरिफायर बांधून तयार असून, त्यामध्ये पाणी भरण्यात आले असून, कोठे गळती आहे का? याची चाचणी घेतली जात आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे जवळपास सर्व काम पूर्ण झाले आहे. फिनिशिंगची कामे बाकी आहेत. चाचणी घेण्याकरिता हे केंद्र सज्ज झाले आहे.बिद्री सबस्टेशन येथूनच वीज हवीपूर्वीच्या मंजूर आराखड्याप्रमाणे बिद्री सबस्टेशन येथून काळम्मावाडी हेडवर्कपर्यंत वीजपुरवठ्याच्या कामाला महावितरणने मान्यता दिली आहे. आता ते बाजूला ठेऊन पुन्हा राधानगरीसारख्या पर्यायी मार्गाने वीजपुरवठा घ्यायचा म्हटला, तर त्यास राज्य, केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.शिवाय राधानगरीकडून काळम्मावाडीपर्यंत वनविभाग, वन्यजीव विभाग यांची जागा असल्याने या विभागांचीही परवानगी घ्यावी लागणार आहे आणि अशा परवानग्या लगेच मिळतील याबाबत शंका आहे.त्याकरिता मुंबई, दिल्ली अशा वाºया कराव्या लागतील, त्यात वेळ जाईल म्हणून मंजूर असलेल्या बिद्री सबस्टेशन येथूनच वीजपुरवठा लाईन टाकाव्यात, असा आग्रह ‘जीकेसी’चा आहे.२०४५ सालच्या लोकसंख्येचा विचारसध्या शहराची लोकसंख्या सहा ते साडेसहा लाख इतकी आहे; त्यामुळे थेट पाईपलाईन योजना राबविताना सन २०४५ मधील संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून त्याचे आराखडे तयार केले आहेत. २०३० मध्ये कोल्हापूरची लोकसंख्या ८ लाख ०५ हजार ९९१ तर २०४५ मध्ये ती १० लाख २९ हजार ९६७ च्या घरात पोहोचणार आहे. जवळपास एक लाख ५४ हजार ४९५ इतक्या तरल लोकसंख्याही गृहीत धरण्यात आली आहे. प्रतिदिन १३५ लिटर पाणी, तर तरल लोकसंख्येत प्रतिदिन २० लिटर्स प्रतिदिन पाणी अशा हिशेबाने पाणीपुरवठा करण्यास ही योजना सक्षम आहे.स्काडा सिस्टीम बसवणारसध्या बालिंगा व शिंगणापूर योजनेतून शहराला पाणी पुरवठा होत आहे; परंतु रोज किती पाणी उपसा करतो, किती पाण्यावर प्रक्रिया होते, आणि किती पाणी पुरविले जाते, याचा हिशेब ठोकताळ्यावर केला जातो. नेमका आकडा कोणालाच सांगता येत नाही; त्यामुळे उपसा आणि पुरवठा यात मोठे अंतर असूनही पाणी कोठे जाते कळत नाही. म्हणून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब लागावा म्हणून थेट पाईपलाईन अंतर्गत स्काडा सिस्टीम बसवली जात आहे; त्यासाठी एक मोठी सुसज्ज इमारत उभी करण्यात आली आहे. हा कक्ष पूर्णपणे संगणकीकरण प्रणालीवर चालणार आहे. धरणातून पाणी किती उचलले. त्यातील किती पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आले. किती पाणी शुद्धीकरण करून शहरवासीयांना पुरविले याचा तासागणिक हिशेब या कक्षात ठेवला जाणार आहे.वीजपुरवठ्यासंबंधी संदिग्धताकाळम्मावाडी धरण क्षेत्रात केल्या जाणाºया वीज पुरवठ्याबाबत संदिग्धता निर्माण केली जात असल्याने या कामात अडथळे येत आहेत. पूर्वीच्या आराखड्यानुसार बिद्री सबस्टेशन ते काळम्मावाडी हेडवर्कपर्यंत ३३ के. व्ही. एक्स्प्रेस फिडर घालण्याबाबत मंजुरी मिळाली आहे. त्याकरिता सुरक्षा अनामत म्हणून ६९ लाख इतकी रक्कम भरण्यात आली आहे. साहित्याचा पुरवठा करून काम करण्यास २२ जानेवारीला महावितरणने मंजुरी दिली. त्यानुसार अडीच किलोमीटर लांबीचे काम पूर्णही झाले. मात्र हे काम खर्चिक असून, राधानगरी सबस्टेशन येथून ३३ के. व्ही.ची अतिउच्च दाब एक्स्प्रेस फिडर वीज वाहिनी टाकण्याचा दुसरा पर्याय पुढे आणला गेला आहे; त्यामुळे वीज पुरवठ्याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.