मतदान केंद्रावर पोलिसांच्या ३६ भरारी पथकांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 07:06 PM2020-11-30T19:06:21+5:302020-11-30T19:08:40+5:30

vidhanparishadelecation, pune, police, kolhapurnews पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी जिल्ह्यातील २८१ मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे, तसेच मतदानावेळी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची ३६ भरारी पथके सज्ज़ केली आहेत.

Watch 36 police squads at the polling station | मतदान केंद्रावर पोलिसांच्या ३६ भरारी पथकांचा वॉच

मतदान केंद्रावर पोलिसांच्या ३६ भरारी पथकांचा वॉच

Next
ठळक मुद्देमतदान केंद्रावर पोलिसांच्या ३६ भरारी पथकांचा वॉचपदवीधर, शिक्षक निवडणूक मतदान : २८१ मतदान केंद्रांवर पोलीस तैनात

कोल्हापूर : पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी जिल्ह्यातील २८१ मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे, तसेच मतदानावेळी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची ३६ भरारी पथके सज्ज़ केली आहेत.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज, मंगळवारी दिवसभर मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन-तीन पोलीस ठेवण्यात येत आहेत.

निवडणूक चुरशीची होणार हे गृहीत धरून सहायक निवडणूक अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तालुक्यासाठी पोलिसांची तीन अशी सुमारे १३ भरारी पथके मतदानावेळी प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार आहे.

दिवसभर १ पोलीस अधीक्षक, २ अप्पर पोलीस अधीक्षक, ५ पोलीस उपअधीक्षक, १८ पोलीस निरीक्षक, ४२ सहायक पोलीस निरीक्षक तसेच ६०४ पोलीस अंमलदार यांचा पोलीस यंत्रणा तैनात आहे. याशिवाय ३ रिझर्व्ह कमांडो फोर्स (आरसीपी), ३ जलद कृती दल पथके (क्यूआरटी) ही विशेष पथकेही सज्ज़ झाली आहेत.

 

Web Title: Watch 36 police squads at the polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.