शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात रोडरोमिओंची धुलाई

By admin | Updated: July 17, 2015 01:07 IST

पोलिसांची धडक मोहीम : महाविद्यालय परिसरात ७७ जणांवर कारवाई

कोल्हापूर : शहरातील विवेकानंद महाविद्यालयासह अन्य शाळा, कॉलेज, होस्टेल आवारातील रोड-रोमिओंची शाहूपुरी पोलिसांनी चांगलीच धुलाई केली. अचानक झालेल्या कारवाईमुळे या परिसरात उभे असलेले तरुण सैरावैरा पळत सुटले. यावेळी सुमारे ७७ जणांवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम गुरुवारी दुपारी बारा ते दोन या वेळेत राबविण्यात आली. दरम्यान, ही धडक मोहीम शहरातील अन्य महाविद्यालयांच्या परिसरात ज्या-त्या पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी राबविणार आहेत. ‘कॉलेज म्हणजे टाइमपास’ असा नवीन फंडा रुजविण्याचा प्रयत्न शहरामधील महाविद्यालयांतील काही तरुणांकडून होत आहे. ग्रुपचे वर्चस्व, तरुणींच्या छेडछाडीचे प्रकार यावरून तरुणांत होत असलेल्या हाणामारीमुळे महाविद्यालयातील शैक्षणिक पावित्र्य नष्ट होत चालले आहे. शहरातील बहुतांश महाविद्यालये सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत सुरू असतात. दरम्यान, या वेळेत तरुण क्लासरूममध्ये न बसता बाहेर कट्ट्यावर, कॅम्पसमध्ये बसून टिंगलटवाळी करीत असतात. पालकांनी केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत अशा तरुणांना ‘धरा आणि ठोका’ असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पोलिसांना दिले. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी विवेकानंद कॉलेजसह ताराबाई पार्क, नागाळा पार्क, विचारेमाळ, सदर बझार परिसरातील शाळा, कॉलेज, विद्यार्थिनी वसतिगृह परिसरात फेरफटका मारला. शाळा, कॉलेजसह वसतिगृहाच्या आवारात दुचाकी फिरविणाऱ्या, ग्रुपने टिंगल-टवाळी करणाऱ्या तरुणांकडे चौकशी करीत त्यांची धुलाई करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांसह काही पोलीस साध्या वेशात असल्याने तरुण बेसावध राहिले. हातात सापडेल त्याला पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. त्यानंतर भर रस्त्यावर बैठका (उठाबशा) काढण्यास भाग पाडले. यावेळी काही तरुणांनी हात जोडून पोलिसांना कारवाई न करण्यासाठी विनंती केली. ४० तरुण, तर ३७ दुचाकीचालकांवर अशा सुमारे ७७ रोड-रोमिओंवर मुंबई पोलीस कायदा (११०/७) नुसार सार्वजनिक ठिकाणी गोंगाट करणे, शांततेला बाधा आणणे या कलमाखाली कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्यासह बीट मार्शल व गुन्हे शाखेच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)