शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचनेची तारीख दोन दिवसांत

By admin | Updated: July 26, 2015 00:42 IST

महापालिका निवडणूक : उत्सुकता शिगेला; प्रथमच महिलांना ५० टक्के संधी

कोल्हापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि त्यावरील आरक्षण जाहीर होण्यास आता काही दिवसांचाच अवधी राहिला. महानगरपालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला असून, तो कधी जाहीर करायचा याबाबतचे मार्गदर्शन उद्या, सोमवारी किंवा मंगळवारी पालिका प्रशासनाला मिळण्याची शक्यता आहे. आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग निश्चिती आणि आरक्षण याबाबत शहरात कमालीची उत्सुकता आहे. सध्याच्या ७७ प्रभागांतील इच्छुकांच्या नजरा त्यावरच खिळून राहिल्या आहेत. महापालिका प्रशासनाला प्रत्येक दहा वर्षांनी प्रभाग रचना बदलावी लागत असल्याने यावेळी ती बदलण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्याचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. ज्या दिवशी प्रभाग जाहीर केले जाणार आहेत, त्याच दिवशी जाहीर सोडतीद्वारे त्या-त्या प्रभागातील आरक्षणही जाहीर करण्यात येणार आहे. ही तारीख सोमवारी किंवा मंगळवारी कळण्याची शक्यता आहे. सध्या शहराची लोकसंख्या ५ लाख ४९ हजार २३७ इतकी असून, कमीत कमी ६१००, तर जास्तीत जास्त ७००० लोकसंख्या गृहीत धरून प्रभाग तयार करण्यात आलेले आहेत. एका प्रभागात सर्वसाधारण साडेपाच ते सहा हजार मतदारांचा समावेश असेल. यंदा प्रथमच महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळणार आहे. यावर्षी चार प्रभाग वाढले आहेत. (प्रतिनिधी) प्रभाग, आरक्षण निश्चित झाल्यावर भूमिका ठरवू : पालकमंत्री महानगरपालिका निवडणुकीसाठी आधी प्रभाग, आरक्षण निश्चित होऊ देत; मग कोणाबरोबर युती करायची की स्वतंत्र लढायचे ते ठरवू, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. निवडणूक प्रक्रियाच सुरू झाली नाही. त्यामुळे अद्याप कोणाशीही चर्चा सुरू नाही. चर्चा करायची झाली तर ती कोणत्या मुद्द्यावर करायची, असा प्रश्नच पालकमंत्र्यांनी विचारला. ताराराणी आघाडीसोबत युती करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची चर्चा सुरू असल्याबाबत पालकमंत्र्यांनी खंडन केले. मंत्री म्हणून मला सगळेच भेटत असतात. निवडणूक जवळ येईल, तेव्हा पाहूया, असे ते म्हणाले. शिवसेना-भाजप यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबत काही बोलायचे नाही,’ असे सांगून उत्तर देण्याचे टाळले.