शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

युध्दाची झळ.. कोल्हापुरात वसुलीसाठी बँकांची दमछाक; साखर कारखान्यांकडे अडकले कोट्यवधी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 19:23 IST

कोल्हापूर : इस्त्राईल-इराण युध्दाची झळ भारतीय अर्थव्यवस्थेला बसू लागली आहे. मार्च अखेर आल्याने बँकांची कर्जाच्या वसुलीची लगबग वाढली आहे. ...

कोल्हापूर : इस्त्राईल-इराण युध्दाची झळ भारतीय अर्थव्यवस्थेला बसू लागली आहे. मार्च अखेर आल्याने बँकांची कर्जाच्या वसुलीची लगबग वाढली आहे. पण, युध्दामुळे सगळेच मार्केट सावध पाऊले टाकत आहे, त्यात साखर कारखान्यांकडे ऊस बिलाचे कोट्यवधी रुपये अडकल्याने सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांची यंदा वसुली करताना पुरती दमछाक उडत आहे.दरवर्षी वित्तीय संस्थांना जानेवारीपासूनच वसुलीच्या मागे लागावे लागते. मार्च संपण्यासाठी दहा दिवस राहिल्याने वसुली पथके अधिक आक्रमक झाल्याचे दिसते. यंदा, युध्दाचा परिणाम थेट मार्केटवर दिसत आहे. संपूर्ण मार्केट सावध पाऊले टाकत असल्याने व्यवहार काहीसा विस्कळीत दिसत आहे. व्यावसायिक कर्जे काहीसी थांबली आहेत. त्याचा परिणाम बँकांच्या कर्ज वाटपासह वसुलीवरही दिसत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.जिल्ह्याच्या अर्थकारणाचे प्रमुख केंद्र असलेला साखर कारखान्यांकडून शेवटच्या महिन्यात गाळप झालेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. मार्चअखेर संपूर्ण पीक कर्जाची परतफेड झाली नाहीतर डाॅ. पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात आहेत.

गावोगावी वसुली पथकांच्या गाड्या

सहकारी बँका, पतसंस्था, क्रेडिट सोसायटीकडून ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणात कर्ज उचल असते. तारणांसह विनातारण कर्जदारांची संख्याही खूप असते. वर्षभर परतफेडीकडे दुर्लक्ष केलेल्या कर्जदारांच्या दारात जाण्याची वेळ वित्तीय संस्थांना येते. त्यामुळे सध्या गावोगावी वसुली पथकांच्या गाड्या फिरू लागल्या आहेत.सोनेतारण कर्जाला तेजी!सध्या सोन्याला भाव चांगला असल्याने सोने तारण कर्ज वाटप वाढले आहे. साधारणता गेल्या वर्षभरात सोन्याचा भाव दुपटीपेक्षा अधिक झाला आहे. त्यात व्याजदर कमी आणि इतर कागदपत्रांची कटकट नसल्याने सध्या सोनेतारण एकदम जाेरात सुरू आहे.

युध्दामुळे व्यावसायिक कर्ज वितरणावर थोडासा परिणाम दिसत आहे. एकूणच मार्च अखेर आली की वसुलीसाठी सगळ्यांचीच तारांबळ उडते. पण, यंदा अद्याप साखर कारखान्यांकडून शेवटच्या महिना-दीड महिन्यांची ऊस बिले यायची आहेत, त्याचाही परिणाम वसुली दिसत आहे. - मंगेश पाटील (शाखा व्यवस्थापक, यशवंत सहकारी बँक, रंकाळावेश)

English
हिंदी सारांश
Web Title : War's Shadow: Banks Struggle in Kolhapur Due to Sugar Mills

Web Summary : Israel-Iran war impacts Kolhapur's economy. Banks face challenges recovering loans as sugar mills owe crores in cane payments. Farmers risk losing subsidies. Gold loans surge amidst financial strain. Recovery efforts intensify.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरbankबँकkolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने