शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 19:14 IST

Vidhan Parishad Election, pune, collcatoroffice, kolhapurnews पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी उद्या, मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत कोल्हापूर जिल्ह्यातील २८१ केंद्रांवर मतदान होत आहे. सोमवारी सकाळीच साडेतीन हजार कर्मचारी मतदानाचे साहित्य घेऊन केंद्रांवर पोहोचले असून, मतदानासाठीची यंत्रणा सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देपदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज ३५०० कर्मचारी साहित्यासह रवाना : गुरुवारी मतमोजणी

कोल्हापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी उद्या, मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत कोल्हापूर जिल्ह्यातील २८१ केंद्रांवर मतदान होत आहे. सोमवारी सकाळीच साडेतीन हजार कर्मचारी मतदानाचे साहित्य घेऊन केंद्रांवर पोहोचले असून, मतदानासाठीची यंत्रणा सज्ज झाली आहे.पुणे पदवीधर मतदारसंघातून ६३, तर शिक्षक मतदारसंघातून ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यावेळेला पहिल्यांदाच पक्षीय पातळीवर ही निवडणूक होत असल्याने चुरस पाहावयास मिळत आहे. महाविकास आघाडीकडून पदवीधरमधून अरुण लाड, तर शिक्षकमधून प्रा. जयंत आसगावकर हे रिंगणात आहेत.

भाजपकडून अनुक्रमे संग्राम देशमुख व जितेंद्र पवार (पुरस्कृत) यांनी त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. यापुर्वी ही निवडणूक कधी झाली, हे सामान्य माणसाला कळायचेही नाही; मात्र यावेळेला लोकसभा व विधानसभा निवडणूकीप्रमाणे प्रचार सभा पाहावयास मिळाल्या.

राज्यात अनपेक्षितपणे आकारास आलेल्या महाविकास आघाडीची पहिली निवडणूक असल्याने तिन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे, तर पुणे पदवीधरचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी भाजपचे निकराचे प्रयत्न आहेत.अत्यंत चुरशीने ही निवडणूक होत असून, त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. पदवीधरसाठी २०५, तर शिक्षकसाठी ७६ केंद्रांवर मतदान होत आहे. सोमवारी सकाळी मतदान साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले. उद्या, सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार असून, गुरुवारी सकाळी आठपासून पुणे येथे मतमोजणी होणार आहे.एका केंद्रावर १२ कर्मचारीएका मतदान केंद्रावर १२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, अशा ३५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एका केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी (४०० पेक्षा जास्त मतदान असेल तर ४), १ शिपाई, २ आरोग्य कर्मचारी, २ कर्मचारी सोशल डिस्टन्सिंगसाठी, १ अंगणवाडी कर्मचारी, १ पोलीस किंवा होमगार्ड. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकkolhapurकोल्हापूरPuneपुणेcollectorजिल्हाधिकारी