शिरोळ तालुक्यात मतदानाला सुरुवात; राजू शेट्टी यांनी केले कुटुंबीयासमवेत मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 10:00 IST2024-05-07T10:00:17+5:302024-05-07T10:00:38+5:30

यावेळी त्यांच्या समावेत त्यांच्या कुटुंबीयांनी देखील मतदान केले. मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी मातोश्रींचा आशीर्वाद घेऊन आलो असल्याचे शेट्टींनी सांगितले.

Voting begins in Shirol taluka; Raju Shetty voted with his family | शिरोळ तालुक्यात मतदानाला सुरुवात; राजू शेट्टी यांनी केले कुटुंबीयासमवेत मतदान

शिरोळ तालुक्यात मतदानाला सुरुवात; राजू शेट्टी यांनी केले कुटुंबीयासमवेत मतदान

शिरोळ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजू शेट्टी यांनी मंगळवारी सकाळी  मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या समावेत त्यांच्या कुटुंबीयांनी देखील मतदान केले. मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी मातोश्रींचा आशीर्वाद घेऊन आलो असल्याचे शेट्टींनी सांगितले.

शेट्टी म्हणाले, मागील पंचवार्षिकला झालेला पराभव हा कटकारस्थानाचा भाग होता. मात्र पराभवाबद्दल मी आदळआपट करत बसलो नाही. . काही धोरणांमध्ये बदल केला. आता निवडणुकीला सामोरे जात असताना मला पूर्णतः विजयाची खात्री आहे. असे शेट्टी यांनी सांगितले. दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सध्या रंगतदार पातळीवर आली  आहे.

Web Title: Voting begins in Shirol taluka; Raju Shetty voted with his family