शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सामाजिक सलोख्याचा संदेश जपण्यासाठी विशाळगडास भेट - सुजात आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:29 IST

गजापूर येथील मशिदीजवळ पोलिस कुमक

आंबा : राजकीय पोळी भाजण्यासाठी शिवरायांचा चुकीचा इतिहास सांगून दोन जातींमध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. अनाजी पंताची प्रवृत्ती जपलेल्यांनी आम्हाला शिवाजी महाराज शिकवू नये. सामाजिक सलोख्याचा संदेश जपण्यासाठी विशाळगडला भेट दिल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले. विशाळगड येथील भेटीवेळी आंबेडकर यांनी ग्रामस्थ व प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.रविवारी विशाळगडावरील मलिक रेहानबाबा उरूसाचा पहिला दिवस होता. यानिमित्त सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांसह दर्गामध्ये भेट देऊन दर्शन घेतले. दर्गासह गडपरिसराची त्यांनी पाहणी केली. दुपारी अडीच वाजता ते गडावर पोहचले होते. विशाळगड आणि गजापूर, बौद्धवाडी येथे त्यांचे स्वागत करण्यात आले.शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक विजयकुमार घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली गजापूर परिसरात ७० पोलिस व ६ अधिकारी तैनात होते. गजापूर येथील मशिदीजवळ पोलिस कुमक होती. उरूसाच्या पहिल्या दिवशी सुमारे १३६५ भाविक व पर्यटकांनी दहा ते पाच या वेळेत भेट दिली. पाच नंतरही भाविक गडाकडे येत होते, पण त्यांना पोलिसांनी माघारी पाठवले. सायंकाळी पाच नंतर पोलिसांनी गड परिसरात गस्त घालून सर्वांना गडाखाली पाठवले.दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर व भारत भाई पाटील यांनीही दुपारी भेट देऊन दोन्ही समाजातील लोकांना सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले. नारकर म्हणाले, उरूसास बंदी घालण्याचे कोणतेही समर्थनीय कारण नाही. प्रशासनाने घातलेली बंदी अनाकलनीय आहे.उरूसास प्रशासनाने नाकारले असले, तरी आज परंपरेनुसार भाविकांनी हजेरी लावून देवदर्शन घेतले. मुक्कामास बंदी असल्याने गडावरील दोनशेवरील निवासगृहे कुलूपबंद होती.सलोखा राखलाच पाहिजेशिवरांच्या सैन्यात अठरा पगड जातीचे मावळे होते. मुस्लीम सैनिकही स्वराज्याच्या कार्यात होते. स्वराज्य सर्वधर्म सहिष्णूतेवर आधारलेले होते, त्याचे प्रतिक विशाळगड आहे. दोन्ही धर्मियांचे लोक येथे सलोख्याने पिढ्यान् पिढ्या राहतात. समाजातील सलोखा कायम राखला पाहिजे, असा विश्वास सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केला. विशाळगडावरील जनजीवन पूर्ववत होत असून, पर्यटकांमुळे स्थानिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगडVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी