कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 15:12 IST2018-01-30T15:11:52+5:302018-01-30T15:12:38+5:30
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आणखी एक मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेला कोल्हापूर सत्र न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर
ठळक मुद्देयापूर्वी या प्रकरणातील आणखी एक आरोपी सीमर गायकवाडला जामीन मंजूर झाला आहे.
कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आणखी एक मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेला कोल्हापूर सत्र न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. तावडेवर पानसरे यांच्या हत्येत सहभागी असल्याचा आरोप आहे. हत्या करण्याआधी तावडेने कोल्हापूरात येऊन रेकी करुन शस्त्रास्त्राची व्यवस्था केल्याचा आरोप आहे.
यापूर्वी या प्रकरणातील आणखी एक आरोपी सीमर गायकवाडला जामीन मंजूर झाला आहे. गायकवाड पाठोपाठ तावडेला जामीन मंजूर झाल्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत कि, नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे.