राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे चुली पेटवून जोरदार निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 18:12 IST2021-07-03T18:10:57+5:302021-07-03T18:12:36+5:30

Ncp Kolhapur : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीने तर हिमटोक गाठले असून, सामान्य माणसाला मेटाकुटीला आणणाऱ्या भाजपला नेस्तनाबूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.

Violent protests by the Nationalist Congress Party | राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे चुली पेटवून जोरदार निदर्शने

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे चुली पेटवून जोरदार निदर्शने

ठळक मुद्दे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे चुली पेटवून जोरदार निदर्शनेमहागाईचा आगडोंब उसळणाऱ्या भाजपला नेस्तनाबूत करा : ए. वाय. पाटील

कोल्हापूर : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीने तर हिमटोक गाठले असून, सामान्य माणसाला मेटाकुटीला आणणाऱ्या भाजपला नेस्तनाबूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने शहर कार्यालयासमोर चुली पेटवून जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारविरोधातील घोषणाबाजीने कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या वेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल चढविला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, गेल्या सात वर्षांत देशातील जनतेला देशोधडीला लावण्याचे पाप नरेंद्र मोदी यांनी केले. आता पुरे झाले, सामान्य माणसाला उद्धवस्त करणाऱ्या या राज्यकर्त्यांना हद्दपार करण्याची वेळ आली आहे.

स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर म्हणाले, सामान्य माणसासाठी काम करणाऱ्या राज्यातील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जातो. मात्र, राममंदिर जमीन खरेदीमध्ये झालेल्या घोटाळा ईडीला दिसत नाही का? देशात जाती-जातींमध्ये भांडणे लावून आपली पोळी भाजून घेण्याचा उद्योग करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला आहे.

उद्योगपती व्ही. बी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अजित राऊत, मधुकर जांभळे, उत्तम कोराणे, रोहित पाटील, महेंद्र चव्हाण, जहिदा मुजावर, सुहास साळोखे, रमेश पोवार, प्रसाद उगवे, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, अनिल घाटगे , शिवाजी देसाई आदी उपस्थित होते.
 

Web Title: Violent protests by the Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.