शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

आचारसंहितेचे उल्लंघन; कोल्हापुरात ए. वाय. पाटील यांच्यासह ४० जणांवर गुन्हा

By उद्धव गोडसे | Published: April 16, 2024 12:37 PM

महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना समर्थन देण्यासाठी घेतला विनापरवानगी मेळावा

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना समर्थन देण्यासाठी विनापरवानगी मेळावा घेऊन आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह ४० जणांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुईखडी येथील एका मंगल कार्यालयात रविवारी (दि १४) दुपारी मेळावा झाला होता. याबाबत करवीर पोलिस ठाण्यातील हवालदार अविनाश भिकाजी पोवार यांनी फिर्याद दिली.लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या गटाचा पुईखडी येथील मंगल कार्यालयात मेळावा झाला. तसेच शहरातून वाहनांच्या रॅलीने कार्यकर्ते न्यू पॅलेस येथे गेले. याबाबत पोलिस आणि निवडणूक निर्णय अधिका-यांची कोणतीही परवानगी घेतली नाही. जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ए. वाय. पाटील यांच्यासह अविनाश आनंदराव पाटील, राजाराम यशवंत पाटील, शिवानंद महाजन (चौघे रा. सोळांकूर, ता. राधानगरी), दिनकर बाळा पाटील (रा. आणाजे), राजाराम काकडे (रा. आवळी), नेताजी पाटील (रा. मांगोली), शिवाजी पाटील (रा. तारळे), दीपक पाटील (रा. कांबळवाडी) यांच्यासह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल झाला. आचारसंहिता उल्लंघनाचा जिल्ह्यात हा पहिलाच गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४A. Y Patilए. वाय. पाटीलCrime Newsगुन्हेगारीCode of conductआचारसंहिता