शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण दूध वाहनांची तोडफोड; संकलनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:19 AM

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध संकलन बंदला दुसऱ्या दिवशी हिंसक वळण लागले. दूध वाहतूक करणाºया सात वाहनांवर दगडफेक करण्यात आली. अनेक ठिकाणी वाहने आडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतण्यात आले किंवा त्याचे वाटप करण्यात आले. रात्री पावणेबाराच्या सुमारास दानोळीजवळ दुधाचा एक टॅँकर पेटविण्यात आला. यामुळे दूध संघांच्या दूध संकलनावर ...

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध संकलन बंदला दुसऱ्या दिवशी हिंसक वळण लागले. दूध वाहतूक करणाºया सात वाहनांवर दगडफेक करण्यात आली. अनेक ठिकाणी वाहने आडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतण्यात आले किंवा त्याचे वाटप करण्यात आले. रात्री पावणेबाराच्या सुमारास दानोळीजवळ दुधाचा एक टॅँकर पेटविण्यात आला. यामुळे दूध संघांच्या दूध संकलनावर परिणाम झाला. अनेक गावांत शेतकºयांनी स्वयंस्फूर्तीने संकलन बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.सर्वाधिक दूध संकलन असणाºया ‘गोकुळ’चे पाच लाख तर ‘वारणा’ संघाचे अडीच लाख लिटर संकलन होऊ शकलेले नाही. पोलीस बंदोबस्तात ‘गोकुळ’चे ३५ हून अधिक दुधाचे टॅँकर मुंबईकडे रवाना झाले आहेत. दोन दिवस संकलनावर परिणाम झाला असला तरी शहरात दुधाची टंचाई फारशी जाणवत नाही.

गाय दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी सोमवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध संकलन बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला सोमवारी जिल्ह्णातील सर्वच दूध संघांनी संकलन बंद ठेवून पाठिंबा दिला होता; त्यामुळे फारसा तणाव निर्माण झाला नाही. मंगळवारपासून ‘गोकुळ’सह बुहतांशी संघांनी संकलन सुरू केले.‘गोकुळ’ ने पहाटे साडेपाच वाजल्यापासून प्राथमिक दूध संस्थांत संकलन करून बहुतांशी दुधाचे टेम्पोे सकाळी आठपर्यंत दूध प्रकल्पावर आणले. सकाळी साडेपाच लाख लिटर दूध संकलन होते, पण मंगळवारी ३ लाख २३ हजार लिटर संकलन झाले. सायंकाळी पाच लाख लिटर संकलनापैकी केवळ अडीच लाख लिटरच होऊ शकले.

‘वारणा’ दूध संघाचे रोजचे साडे तीन लाख लिटर संकलन आहे, मंगळवारी सकाळी ७५ हजार लिटर तर सायंकाळी ६० हजार लिटर संकलन होऊ शकले. करवीर, कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील अनेक संस्थांनी स्वत:हून संकलन बंद ठेवले. गगनबावडा तालुक्याला पुराच्या पाण्याने वेडा दिल्याने वाहतूकच ठप्प झाली आहे. रविवारी रात्रीपासून दुधाची वाहतूक करणाºया वाहनांचे तोडफोडीचे सत्र मंगळवारीही कायम राहिले. शिरोळ, निढोरी, मुडशिंगी, कोगनोळी येथे तोडफोड करण्यात आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. ‘गोकुळ’ ने मंगळवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात दुधाचे १५ तर सायंकाळी १८ टॅँकर मुंबईकडे रवाना झाले. दुपारी तीन वाजता कर्नाटकातील ‘नंदिनी’ दूध संघाच्या चार टॅँकरची वाहतूकही मुंबईकडे झाली.टॅँकर, टेम्पोची अडवणूकदूध बंद आंदोलनाच्या दुसºया दिवशी स्वाभिमानी कार्यकर्ते आक्रमक झाले. उदगाव येथे सात वाहनांवर दगडफेक करण्यात आली. तर धामोड, इचनाळ, गोगवे, बांववडे येथे दुधाचे टेम्पो अडवून त्यातील दूध रस्त्यावर फेकण्यात आले. अंबप येथे रात्री दूध वितरणासाठी आलेला टेम्पो फोडण्यात आला. या पार्श्वभूमीवर संकलन केंद्रे, दूध संघाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. ग्रामीण भागात आंदोलनाला पाठिंबा मिळत असून, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दूध संकलन बंद आहे.लिटरला ३ रुपये दरवाढ देण्याचा विचारकोल्हापूर : स्वाभिमानीच्या दूध बंद आंदोलनाचा धसका राज्य शासनाने मंगळवारी चांगलाच घेतला. राज्यात झालेल्या दूधकोंडीतून तोडगा म्हणून लिटरला तीन रुपये दरवाढ देण्याचा विचार शासन करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. -वृत्त/४‘स्वाभिमानी’ ने रणनीती बदलली?स्वाभिमानीच्या आंदोलनाला सरकारने बेदखल केले, त्यातच ‘गोकुळ’, ‘वारणा’ दूध संघांनी संकलन सुरू केल्याने कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत. पोलीस बंदोबस्तात दूध वाहतूक सुरू करून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे; त्यामुळे आजपासून कार्यकर्ते अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शेतकरी जनावरांसह महामार्गावर येण्याच्या तयारीत आहेत.पुराच्या पाण्याचाही परिणामदूध बंद आंदोलनामुळे दुधाची वाहतूक होऊ शकली नसली तरी पुराच्या पाण्याचाही फटका बसला आहे. जिल्ह्णाच्या पश्चिमेकडील तालुक्यात नद्यांना पूर आल्याने अनेक रस्ते बंद झाले आहेत; त्यामुळे दुधाची वाहतूक होऊ शकली नाही.‘गोकुळ’ दूध वाहतुकीचे केंद्रकर्नाटकातील दूध संघांसह खासगी संघांचे टॅँकर ‘गोकुळ’ मध्ये एकत्रित करून तेथून पोलीस बंदोबस्तात मुंबईकडे पाठविले जातात. विशेष म्हणजे रात्री ऐवजी आता दिवसाच टॅँकरची वाहतूक केली जात आहे.शिरोळमध्ये शंभर टक्के बंदस्वाभिमानीचा प्रभाव क्षेत्र असलेल्या शिरोळ तालुक्यात संकलन होऊ शकले नाही.शेतकºयांनी स्वयंस्फूर्तीने संकलन बंद ठेवून आंदोलनाला दुसºया दिवशीही पाठिंबा दिला.दूध वाहतुकीसाठी शासनाचा दबावमुंबईतील दूध रोखून सरकारची नाकेबंदी करण्याची व्यूहरचना ‘स्वाभिमानी’ची आहे; पण सरकारनेही कोणत्याही परिस्थितीत दूध वाहतूक झाली पाहिजे, यासाठी दूध संघांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाkolhapurकोल्हापूर