हाॅकी कोल्हापूरच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी विनोद नायकवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:28 IST2021-09-06T04:28:13+5:302021-09-06T04:28:13+5:30

अन्य कार्यकारिणी अशी, अनिल परांडेकर, जया शिंदे, कविता साळोखे, संतोष शेळके (उपाध्यक्ष), ताहीर शेख, संदीप शिंदे, कल्पना भोसले, अनुराधा ...

Vinod Nayakwadi as Senior Vice President of Hockey Kolhapur | हाॅकी कोल्हापूरच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी विनोद नायकवडी

हाॅकी कोल्हापूरच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी विनोद नायकवडी

अन्य कार्यकारिणी अशी, अनिल परांडेकर, जया शिंदे, कविता साळोखे, संतोष शेळके (उपाध्यक्ष), ताहीर शेख, संदीप शिंदे, कल्पना भोसले, अनुराधा चव्हाण (सहसचिव), तर सदस्यपदी संताजी भोसले, शकील भालदार, स्पर्धा समिती प्रमुख सागर यवलुजे, संताजी घोरपडे, शकील महालदार, प्रसिद्धीप्रमुख म्हणून मोहन भांडवले, संदीप जाधव यांचा समावेश आहे. पंचप्रमुख म्हणून संदीप जाधव, धीरज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या सभेत रविवारी (दि. २६) पासून कनिष्ठ गटातील मुले, मुलींसाठी क्रीडा वैद्यक शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतर पुरुष व महिला हाॅकी लीग स्पर्धाही आयोजित करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. शालेय हाॅकी स्पर्धांबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी डाॅ. चंद्रशेखर साखरे यांची भेट घेतली जाणार आहे. या भेटीत त्यांच्यासोबत हाॅकीसह विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे.

फोटो : ०५०९२०२१-कोल-हाॅकी

ओळी : हाॅकी कोल्हापूर या हाॅकी संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारिणी रविवारी जाहीर करण्यात आली. यात डावीकडून बसलेले अनिल परांडेकर, जया शिंदे, सुरेखा पाटील, कविता साळोखे, अनुराधा चव्हाण, मोहन भांडवले. मागे उभे असलेले ताहीर शेख, सागर जाधव, संदीप शिंदे, संतोष शेळके, धीरज पाटील व संदीप जाधव उपस्थित होते.

-------

Web Title: Vinod Nayakwadi as Senior Vice President of Hockey Kolhapur