निवडणुका असो अगर कार्यक्रम विनायक राऊतांना ‘बॅग’ द्यावी लागते, राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 16, 2022 14:58 IST2022-07-16T14:57:17+5:302022-07-16T14:58:03+5:30

..तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा एकही शिवसैनिक शिल्लक राहणार नाही.

Vinayak Raut has to pay in elections, Rajesh Kshirsagar serious allegation | निवडणुका असो अगर कार्यक्रम विनायक राऊतांना ‘बॅग’ द्यावी लागते, राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप

निवडणुका असो अगर कार्यक्रम विनायक राऊतांना ‘बॅग’ द्यावी लागते, राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप

कोल्हापूर : विनायक राऊत हे ज्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय जात नाही, निवडणुका असो अगर कोणताही कार्यक्रम त्यांची ‘बॅग’ तयार ठेवायला लागते असा गंभीर आरोप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत केला. राऊत यांनी काल, शुक्रवारी शिवसेनेच्या जिल्हा मेळाव्यात केलेल्या आरोपाला प्रत्यूत्तर देताना क्षीरसागर यांनी राऊतांवर सडकून टिका केली.

क्षीरसागर म्हणाले, ज्यांचा शिवसेनेशी काडीमात्र संबंध नाही, ज्यांनी सगळे पक्ष सहलीप्रमाणे फिरुन घेतले, त्यांचे ऐकून विनायक राऊत माझ्यावर टिका करत असतील तर पुढील काळात शिवसेना संपवायचे कॉन्ट्रॅक्ट राऊत यांनी घेतले आहे, त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा एकही शिवसैनिक शिल्लक राहणार नाही. मला ‘बेंन्टेक्स’ म्हणून हिणवणाऱ्यांनी स्वत:तील चोखपणा दाखवून द्यावा असे आव्हानही यावेळी दिले.

कोल्हापूरचे दोन्ही खासदार आमच्याकडेच

कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने हे मनाने आमच्याकडेच आहेत, ते लवकरच आमच्याकडे दिसतील असाही विश्वासही क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

Web Title: Vinayak Raut has to pay in elections, Rajesh Kshirsagar serious allegation