शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ग्रामरोजगार सेवक उद्यापासून संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:30 IST

गारगोटी : ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामरोजगार सेवक १ एप्रिल २०२६ पासून संपावर जाणार ...

गारगोटी : ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामरोजगार सेवक १ एप्रिल २०२६ पासून संपावर जाणार असल्याचा इशारा ग्रामरोजगार सहायक संघटना महाराष्ट्र राज्य, भुदरगड यांनी दिला आहे. याबाबत पंचायत समिती भुदरगड येथील गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांना निवेदन देण्यात आले.संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की,‘२ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार ग्रामरोजगार सहायक हे अर्धवेळ कर्मचारी असून त्यांना निश्चित वेतन किंवा मानधन दिले जात नाही. त्यामुळे उपजीविकेसाठी त्यांना इतर कामे करावी लागतात. सध्या एनएमएमएस प्रणालीद्वारे दोन वेळा हजेरी घेण्याची सक्ती करण्यात येत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत.दरम्यान, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य शासनाने ग्रामरोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन व २ हजार रुपये प्रवास भत्ता देण्याचा शासन निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला सुमारे १८ महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही अशी नाराजी संघटनेने व्यक्त केली आहे.शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करावी तसेच २ मे २०११ चा शासन निर्णय बदलून अर्धवेळ ऐवजी पूर्णवेळ सेवा लागू करावी, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत राज्यातील ग्रामरोजगार सेवक संपावर राहणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष दीपक डोंगरे, सचिव अनिल ईर, कार्याध्यक्ष जॉयल बारदेस्कर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Village Employment Aides to Strike Over Unfulfilled Demands

Web Summary : Village Employment Aides in Maharashtra will strike from April 1, 2026, protesting unfulfilled demands like timely wages and full-time employment. Despite a 2024 government order for increased pay, implementation is delayed. The aides are demanding immediate action and threaten continued strike action.