दानोेळीतील गावठी दारूची हातभट्टी उदध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:25 IST2021-09-03T04:25:38+5:302021-09-03T04:25:38+5:30

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे गावठी दारू तयार करणारी हातभट्टी इचलकरंजी स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस पथकाने तोडफोड करुन ...

The village distillery in Danoli was destroyed | दानोेळीतील गावठी दारूची हातभट्टी उदध्वस्त

दानोेळीतील गावठी दारूची हातभट्टी उदध्वस्त

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे गावठी दारू तयार करणारी हातभट्टी इचलकरंजी स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस पथकाने तोडफोड करुन उदध्वस्त केली. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. या हातभट्टीवरील दोघे कामगार पळून गेले. या कारवाईत सुमारे २९ हजाराहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला.

दानोळी येथे गावठी दारू तयार करण्याची हातभट्टी सुरू असल्याची माहिती इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकास मिळाली. यावेळी पोलीस पथकाने तेथे छापा टाकून तेथील दारू तयार करणारी हातभट्टी उदध्वस्त केली. या कारवाईत शिवाजी विठ्ठल माने, अर्जुन चव्हाण (दोघेही रा. उमाजीनगर, दानोळी, ता. शिरोळ) हे कामगार पळून गेले.

फोटो नं. ०२०९२०२१-कोल-दानोळी दारू

ओळी : दानोळी (ता. शिरोळ) येथील गावठी दारू तयार करणारी हातभट्टी गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने उदध्वस्त केली.

020921\02kol_11_02092021_5.jpg

ओळी : दानोळी (ता. शिरोळ) येथील गावठी दारु तयार करणारी हातभट्टी गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने उध्दवस्त केली.

Web Title: The village distillery in Danoli was destroyed