Video : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन, मंत्री चंद्रकांत पाटलांचीही हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 12:22 IST2018-10-18T12:20:03+5:302018-10-18T12:22:00+5:30
या संचलन कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह, महापौर शोभा बोंद्रे, माजी महापौर सई खराडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष

Video : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन, मंत्री चंद्रकांत पाटलांचीही हजेरी
कोल्हापूर - परंपरेनुसार विजयादशमी दिवशी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेकोल्हापूर शहरातून संचलन झाले. या संचलनाता संघाच्या वेशभूषेत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनीही हजेरी लावली. संघाच्या कार्यकर्त्यांसह एक कार्यकर्ता बनून पाटील या संचलन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या संचलन कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह, महापौर शोभा बोंद्रे, माजी महापौर सई खराडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप देसाई यांच्या उपस्थितीत शहरातील खराडे कालेज मैदानात सकाळी सव्वा सात वाजता ध्वजारोहण झाले.
यावेळी विभाग संघचालक अप्पासाहेब दड्डीकर, सहसंघचालक डॉ. सूर्यकिरण वाघ, जिल्हा कार्यवाह केदार जोशी, विभाग कार्यकारिणी सदस्य मुकूंद भावे, शहर कार्यवाह विवेक मंद्रुपकर, जिल्हा प्रचार प्रमुख अनिरुद्ध कोल्हापूरे उपस्थित होते.