माजी नगरसेवक अनिल आवळे कोरोनाचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 18:21 IST2021-05-08T18:19:52+5:302021-05-08T18:21:19+5:30

CoronaVIrus Kolhapur : महापालिकेचे माजी नगरसेवक अनिल यादोबा आवळे यांचा शनिवारी कोरोनाने बळी घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे चार दिवसापासून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते, पण दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५२ व्या वर्षीच एक्झीट घेतल्याने सर्वानाच धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी माजी नगरसेविका रेखा, दोन मुले, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

Victim of former corporator Anil Awale Corona | माजी नगरसेवक अनिल आवळे कोरोनाचे बळी

माजी नगरसेवक अनिल आवळे कोरोनाचे बळी

ठळक मुद्देमाजी नगरसेवक अनिल आवळे कोरोनाचे बळीवयाच्या ५२ व्या वर्षीच एक्झीट घेतल्याने धक्का

कोल्हापूर : महापालिकेचे माजी नगरसेवक अनिल यादोबा आवळे यांचा शनिवारी कोरोनाने बळी घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे चार दिवसापासून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते, पण दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५२ व्या वर्षीच एक्झीट घेतल्याने सर्वानाच धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी माजी नगरसेविका रेखा, दोन मुले, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

आवळे हे २००५ ते २०१० या काळात भोसलेवाडी कदमवाडी या प्रभागातून राष्ट्रवादी कॉग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांची पत्नी रेखा आवळे या देखील नगरसेविका होत्या. आवळे यांनी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वीकृत संचालक म्हणूनही काम केले होते. सर्वांच्या मदतीला धावून जाण्याचा आवळे यांचा स्वभाव होता. त्यामुळे शनिवारी त्यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावून गेली.
 

Web Title: Victim of former corporator Anil Awale Corona