ठळक मुद्देवीरशैव बँक निवडणूक छाननी : रंजना तवटे, शकुंतला बनछोडे बिनविरोधसात अर्ज अवैध : चंद्रकांत स्वामीही बिनविरोध होणार
कोल्हापूर : वीरशैव को-ऑप. बँकेसाठी दाखल झालेल्या ६३ अर्जांची बुधवारी छाननी झाली. यामध्ये सर्वसाधारण गटातील सहा, तर महिला राखीव गटातील एक, असे सात अर्ज अवैध ठरले. महिला गटात दोन जागांसाठी तीन अर्ज होते, त्यात सुशीला पंजे यांचा अर्ज अवैध ठरल्याने शकुंतला बाबूराव बनछोडे व रंजना कृष्णात तवटे यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.
वीरशैव बँकेच्या १९ जागांसाठी ६३ अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांनी छाननी केली. यामध्ये सर्वसाधारण गटातून अमोल पाटील-चंदूरकर, शिवशंकर हत्तरकी, महाबळेश्वर चौगुले, बंडू संकेश्वरे, सोमनाथ पंजे, सुशीला पंजे यांचे अर्ज अवैध ठरल्याने ४९ अर्ज शिल्लक राहिले, तर महिला गटात सुशीला पंजे यांचा अर्ज अवैध ठरल्याने शकुंतला बनछोडे व रंजना तवटे यांचे अर्ज शिल्लक राहिले, दोन जागांसाठी दोनच अर्ज असल्याने हा गट बिनविरोध होणार आहे.
त्याचबरोबर राखीव गटात चंद्रकांत स्वामी व गुरुदेव चंद्रकांत स्वामी यांचे दोनच अर्ज आहेत, हा गटही बिनविरोध होणार आहे. २१ जानेवारीपर्यंत माघारीची मुदत असून, या कालावधीत सर्वसाधारण गट बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Web Title: Veershaiva Bank Election Scrutiny: Ranjana Tawte, Shakuntala Banchode Unopposed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.